मोदी 3.0 च्या बजेटवर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Budget 2024 । मोदी सरकारच्या 11व्या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणावर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. भाजपचे नेते मोदी 3.0 च्या पहिल्या बजेटचे कौतुक करत आहे. त्याचवेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी या अर्थसंकल्पाबाबत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी या बजेटला त्याला ‘खुर्ची वाचवा’ बजेट असे म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी या अर्थसंकल्पाचे वर्णन केले आहे. हे बजेट भाजपच्या मित्रपक्षांना खूश करणारे असे केले आहे. इतर राज्यांच्या खर्चाने अर्थसंकल्पात त्यांना (मित्रपक्षांना) पोकळ आश्वासने देण्यात आली होती. मित्रांना खूश करण्यासाठी हा अर्थसंकल्प आणला आहे. AA (अदानी अंबानी) यांना याचा फायदा होणार असून सर्वसामान्य भारतीयांना कोणताही दिलासा मिळणार नाही. एवढेच नाही तर राहुल गांधींनी या अर्थसंकल्पाला कॉपी पेस्ट म्हटले आहे. काँग्रेसचा जाहीरनामा आणि मागील अर्थसंकल्पाची नक्कल केल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.
हे वाचले का ?
मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर मायावती नाराज,म्हणाल्या,’लोकांचे जीवन सुखकर होईल का?’
‘तरुणांना संधी मिळेल, आर्थिक विकासाचा वेग वाढेल’; अर्थसंकल्पावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
अर्थसंकल्पावर आप नेते म्हणाले, ‘हे सरकार वाचवा आणि महागाई वाढवा असा…’





