राहुल गांधींची फोनवरून कमला हॅरिस यांच्याशी चर्चा
Updated On:

नवी दिल्ली – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्यात फोनवरून चर्चा झाली. मात्र, त्यांच्यातील चर्चेचा तपशील तातडीने समजू शकला नाही. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे.
विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या उमेदवारीविषयी वय आणि प्रकृतीच्या कारणांमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. त्यामुळे त्यांच्या जागी हॅरिस डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार बनू शकतात, अशी चर्चा रंगली आहे.
त्या भारतीय-आफ्रिकी वंशाच्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर, राहुल आणि हॅरिस यांच्यातील चर्चेविषयी उत्सुकता बळावली आहे. मात्र, कॉंग्रेस पक्षाकडून किंवा स्वत: राहुल यांच्याकडूनही त्या चर्चेविषयी कुठली माहिती देण्यात आलेली नाही.





