Rahul Gandhi : मोदींना ज्ञानेश कुमारांना हटवायला सांगा, 30 सेकंदात आंदोलन थांबेल; राहुल गांधी यांचे प्रत्युत्तर
काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या १ नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर होणाऱ्या रॅलीमुळे दिवाळीच्या काळात व्यवसायावर परिणाम होईल, असे सांगत व्यापारी संघटनेने रॅली पुढे ढकलण्याची विनंती केली होती. यावर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Rahul Gandhi : काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या १ नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर होणाऱ्या रॅलीमुळे दिवाळीच्या काळात व्यवसायावर परिणाम होईल, असे सांगत व्यापारी संघटनेने रॅली पुढे ढकलण्याची विनंती केली होती. यावर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
व्यापाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करायला सांगावी, त्यानंतर अवघ्या ३० सेकंदात हे आंदोलन थांबेल, असे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोमवारी स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटले की दिल्लीतील सर्व व्यापाऱ्यांना मी सांगू इच्छितो की, आमचे तुमच्यावर प्रेम आहे आणि आम्ही तुमचे म्हणणे ऐकत आहोत.
सरकारने मेट्रो बंद केली, रस्ते सील केले आणि आपल्या राजधानीला टाळे ठोकले. जर मतचोरी झाली, तर काहीही सुरक्षित राहणार नाही. तुमचे दुकान, तुमची बचत आणि तुमच्या मुलांचे भविष्यसुद्धा नाही. त्यामुळे मोदींना सांगा की त्यांनी मुख्य आरोपी क्र. ४ ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करावी, ३० सेकंदात आंदोलन थांबेल.
चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहून १ नोव्हेंबरची रॅली १० नोव्हेंबरनंतर आयोजित करण्याची विनंती केली होती. दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या काळात रामलीला मैदानावरील या रॅलीमुळे १०,००० कोटी रुपयांचा व्यापार प्रभावित होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती.
गोयल यांच्या मते, ६ नोव्हेंबरला धनत्रयोदशी, ८ नोव्हेंबरला दिवाळी आणि १० नोव्हेंबरला भाऊबीज आहे. या काळात दिल्लीत सोनं-चांदी, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, फटाके, भांडी आणि भेटवस्तू यांसारख्या विविध क्षेत्रांत मिळून सुमारे २५,००० कोटी रुपयांची उलाढाल होते. सणाच्या काळात ग्राहकांची मोठी गर्दी असते, त्यामुळे ही रॅली सणानंतर घ्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली (Rahul Gandhi) होती.






