Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी 22 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर
Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ अभियानाचा पुढील कार्यक्रम २२ ऑगस्टला पुण्यात होणार आहे. विद्यार्थिनींचे हक्क, सुरक्षा आणि संधींवर चर्चा होणार.

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘विद्यार्थ्यांचा आवाज’ अभियानाचा पुढील कार्यक्रम २२ ऑगस्ट रोजी पुण्यात होणार आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसोबतच विद्यार्थिनींचे हक्क, सुरक्षा, समानता आणि संधी या मुद्द्यांवरही चर्चा होणार आहे.
राहुल गांधी यांनी देशातील विद्यार्थ्यांना या अभियानाशी जोडण्याचे आवाहन केले आहे. देशातील मुलींना समानता, सुरक्षितता, संधी आणि स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे. मात्र, त्यांना असुरक्षितता आणि भेदभावाचा सामना करावा लागत असून, आपल्या हक्कांसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
क्या चाहिए देश की लड़कियों को? बराबरी, सुरक्षा, अवसर और अपनी बात कहने की आज़ादी।
उन्हें मिला क्या है? असुरक्षा, भेदभाव और अपने असली अधिकारों के लिए बस इंतज़ार।
अब और नहीं। 22 अगस्त | पुणे | छात्रों की गूंज
आंदोलन से जुड़ें – अभी रजिस्टर करें।https://t.co/i5B4pG5kk9 pic.twitter.com/B5UVC3WZHC
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 15, 2026
यापूर्वी प्रयागराज येथे ‘विद्यार्थ्यांचा आवाज’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना देशाची सर्वात मोठी ताकद असल्याचे सांगितले होते. त्यांनी ‘दर्द, डेटा और दौलत’ या मुद्द्यांवर भाष्य करत देशातील ४० कोटी तरुणांची क्षमता देशाच्या भविष्यासाठी महत्त्वाची असल्याचे म्हटले होते. तसेच, ‘युवा’ या शब्दात देशातील प्रत्येक नागरिकाचा समावेश होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांना राजकीय आणि सामाजिक चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्याच्या उद्देशाने ‘विद्यार्थ्यांचा आवाज’ अभियान सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी कोटा आणि डेहराडून येथे या अभियानांतर्गत कार्यक्रम झाले आहेत. आता पुण्यातील कार्यक्रम हा या मोहिमेतील पुढील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमात विशेषतः विद्यार्थिनींचे अधिकार, सुरक्षा आणि त्यांना उपलब्ध होणाऱ्या संधी यावर भर दिला जाणार आहे.





