Rahul Gandhi : राहुल गांधींचे मोदींना पुन्हा थेट चर्चेचे आव्हान; म्हणाले, ‘समोरासमोर बसा, दूध का दूध, पानी का पानी होऊ द्या’
Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा थेट चर्चेचे आव्हान दिले. आर्थिक व्यवस्था, अमेरिकेसोबतचा करार, अदानी प्रकरणासह विविध मुद्द्यांवर खुल्या चर्चेची मागणी केली.

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा थेट चर्चेचे आव्हान दिले आहे. ‘विरोधक देशद्रोही आहेत’, असा आरोप केला जात असल्याचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी परदेशी शक्तींशी संबंध कोणाचे आहेत, यावर खुली चर्चा करण्याची मागणी केली.
“तुम्ही वेळ आणि ठिकाण ठरवा. एका बाजूला तुम्ही आणि दुसऱ्या बाजूला मी बसेन. माध्यमे आणि देशातील तरुणांसमोर चर्चा होऊ द्या,” असे राहुल गांधी म्हणाले. या चर्चेसाठी कोणालाही न्यायाधीश बनवा. मोहन भागवत यांच्यासारख्या व्यक्तीलाही न्यायाधीश म्हणून बसवण्याची तयारीही त्यांनी व्यक्त केली.
आर्थिक व्यवस्था, आर्थिक व्यवहार, अमेरिकेसोबत झालेला करार, त्याची घाईने झालेली प्रक्रिया आणि अदानी प्रकरणासह विविध मुद्द्यांवर चर्चेची गरज असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. तसेच ‘एपस्टीन’ प्रकरणाचाही उल्लेख करत त्यांनी मोदींना “घाबरू नका, चर्चा करा,” असे आव्हान दिले.
काय सुरू आहे नेमका वाद ?
राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात विविध राजकीय आणि राष्ट्रीय मुद्द्यांवरून सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. विरोधकांवर देशविरोधी शक्तींशी संबंध असल्याचे आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मोदींना थेट चर्चेचे आव्हान दिले आहे. राहुल गांधी यांनी सार्वजनिक व्यासपीठावर समोरासमोर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.
आर्थिक व्यवस्था, अमेरिका संबंधित करार, अदानी प्रकरण आणि एपस्टीन प्रकरणासह अनेक मुद्द्यांवर खुली चर्चा व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. या चर्चेसाठी माध्यमे आणि देशातील तरुणांसमोर बसण्याची तयारीही त्यांनी व्यक्त केली. मोदींनी हे आव्हान स्वीकारावे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.





