‘१९८० च्या दशकात जे घडलं ते चुकीचं होतं’ ; शीख दंगलींवर राहुल गांधींचे मोठे विधान

Rahul Gandhi on Sikh Riots । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठातील एका कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांशी बोलताना दिसत आहेत. या कार्यक्रमादरम्यान, एका शीख विद्यार्थ्याने राहुल गांधींना १९८४ च्या दंगली आणि शीख मुद्द्यांवर काही प्रश्न विचारले.
विद्यार्थ्याने राहुल गांधींना, “तुम्ही म्हणालात की राजकारण निर्भय असले पाहिजे, घाबरण्यासारखे काहीही नसावे, पण आम्हाला फक्त कडे घालायचे नाही, आम्हाला फक्त पगडी बांधायची नाही, आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे आहे, ज्याची काँग्रेस पक्षाच्या राजवटीत परवानगी नव्हते.” १९८४ च्या दंगलीतील आरोपी सज्जन कुमार सारख्या लोकांना संरक्षण देत असलेल्या शीख आवाजांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही या विद्यार्थ्याने काँग्रेसवर केला.
“You haven’t reconciled with the Sikhs,” a young man tells Rahul Gandhi to his face, reminding him of the unfounded fear-mongering he engaged in during his last visit to the US.
It is quite unprecedented that Rahul Gandhi is now being ridiculed not just in India, but around the… pic.twitter.com/rml7JsDYKI— Amit Malviya (@amitmalviya) May 3, 2025
राहुल गांधींनी हे उत्तर दिले Rahul Gandhi on Sikh Riots ।
यावर राहुल गांधी म्हणाले की, पक्षाच्या अनेक चुका ते नसताना झाल्या. काँग्रेस पक्षाच्या इतिहासात झालेल्या प्रत्येक चुकीची जबाबदारी घेण्यास ते तयार असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी, “मी जाहीरपणे म्हटले आहे की ८० च्या दशकात जे घडले ते चुकीचे होते. मी अनेक वेळा सुवर्ण मंदिराला भेट दिली आहे. भारतातील शीख समुदायाशी माझे खूप चांगले संबंध आहेत.”म्हणत मोठे विधान केले.
अमित मालवीय यांनी राहुल गांधींचा घेतला खरपूस समाचार Rahul Gandhi on Sikh Riots ।
भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक व्हिडिओ शेअर करून राहुल गांधींवर टीका केली आहे. X वरील त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “एका तरुण विद्यार्थ्याने राहुल गांधींना सांगितले की तुम्ही शिखांशी चांगले वागला नाही आणि त्यांच्या गेल्या अमेरिका भेटीदरम्यान पसरलेल्या कथित भीती आणि गोंधळाची आठवण करून दिली. आता राहुल गांधी केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरही टीकेला सामोरे जात आहेत.”





