राहुल गांधींकडून गंभीर चूक ; शिवजंयती दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना वाहिली श्रद्धांजली ; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Rahul Gandhi on Shiv Jayanti । महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395 वी जयंती अलोट उत्साहात साजरी करण्यात आली. राज्यातच नाही तर सर्व देशभर शिवरायांची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. यासाठी अनेक राजकीय नेतेमंडळींकडून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून पोस्ट करत शिवरायांना विनम्र केले आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शिवजयंतीच्या दिवशी गंभीर चूक केली असल्याचे समोर आले आहे.
शिवाजी महाराजांना चक्क श्रद्धांजली वाहिली Rahul Gandhi on Shiv Jayanti ।
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांना चक्क श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन और अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं।
अपने साहस और शौर्य से उन्होंने हमें निडरता और पूरे समर्पण के साथ आवाज़ उठाने की प्रेरणा दी।
उनका जीवन हम सभी के लिए सदैव प्रेरणास्रोत रहेगा। pic.twitter.com/1jOCYOkrC1
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 19, 2025
राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी,” छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरपूर्वक वंदन करतो आणि माझी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या धैर्याने आणि शौर्याने त्यांनी आम्हाला निर्भयतेने आणि पूर्ण समर्पणाने आपला आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणास्रोत राहील.” असे म्हटले आहे. त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये श्रद्धांजली वाहिली असल्याने त्यांच्यावर सत्ताधारी नेत्यांनी निशाणा साधला आहे.
भाजपकडून राहुल गांधींवर टीका Rahul Gandhi on Shiv Jayanti ।
भाजपने आमदार अतुल भातखळकर यांनी राहुल गांधींच्या या कृतीवर प्रतिक्रिया देताना,” राहुल गांधी नेहमी महापुरुषांचा अपमान करत असल्याचा आरोप केला आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे राहुल गांधींना महापुरुषांचा अपमान करण्याची सवय असल्याचेही भातखळकरांनी म्हटले आहे.





