Rahul Gandhi: ‘मोदी सत्याला घाबरले, खोट्याचा आधार घेतला’; राहुल गांधींचा घणाघाती हल्ला
Rahul Gandhi: पंतप्रधानांच्या भाषणांनंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली. "केवळ प्रश्नांमुळे इतकी घबराट? मोदीजी सत्याला इतके घाबरले की त्यांनी खोट्याला शरण गेले. असो, त्यांना जे योग्य वाटले ते त्यांनी केले," अशा शब्दांत गांधींनी मोदींच्या भाषणातील तथ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Rahul Gandhi: राज्यसभेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिभाषणावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर थेट निशाणा साधला असून, “पंतप्रधान सत्याला इतके घाबरले आहेत की त्यांनी आता खोट्याचा आश्रय घेतला आहे,” अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. काँग्रेसनेही या भाषणाचा निषेध करत, पंतप्रधानांचे भाषण म्हणजे निव्वळ ‘डायलॉगबाजी’ आणि ‘आत्ममुग्धता’ असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधानांना प्रश्नांची भीती: राहुल गांधी
पंतप्रधानांच्या भाषणांनंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली. “केवळ प्रश्नांमुळे इतकी घबराट? मोदीजी सत्याला इतके घाबरले की त्यांनी खोट्याला शरण गेले. असो, त्यांना जे योग्य वाटले ते त्यांनी केले,” अशा शब्दांत गांधींनी मोदींच्या भाषणातील तथ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
बस सवालों से इतनी घबराहट?
मोदी जी सच्चाई से ऐसा डरे,
झूठ की शरण ले ली।खैर, जो उचित समझा, वही किया।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 5, 2026
हे भाषण की निवडणूक रॅली? – जयराम रमेश
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधानांच्या 100 मिनिटांच्या भाषणावर सडकून टीका केली. हे भाषण नसून एखादी निवडणूक रॅली वाटत होती, असा दावा त्यांनी केला.
काँग्रेसचे मुख्य आक्षेपांमध्ये म्हटले आहे की, मोदींनी भाषणात नेहमीप्रमाणे तथ्यांची फेरफार करण्यात आली. विरोधकांवर टीका करताना भाषेची मर्यादा ओलांडली गेली. भाषणात मुद्द्यांपेक्षा नाटकीयता आणि ‘डायलॉगबाजी’ जास्त होती. पंतप्रधानांचे भाषण सुरू असताना विरोधी खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि नंतर सभात्याग (वॉकआउट) केला.
लोकसभेत गदारोळ, राज्यसभेत भाषण –
बजेट अधिवेशनाच्या सातव्या दिवशी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्ताव पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय, गदारोळातच मंजूर करण्यात आला. मात्र, गुरुवारी राज्यसभेत पंतप्रधानांनी सुमारे 100 मिनिटे भाषण केले. राहुल गांधी यांना लोकसभेत बोलण्यापासून रोखल्याच्या मुद्द्यावरून राज्यसभेतही विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला.
PM Modi: ‘काँग्रेस कधीच माझी कबर खोदू शकणार नाही’; पंतप्रधान मोदींचा राज्यसभेत घणाघात





