Rahul Gandhi : पंतप्रधान देशद्रोही असल्याचे मी पाच मिनिटांत सिद्ध करेन; राहुल गांधींचे पुन्हा खुल्या चर्चेचे आव्हान
मोदी देशविरोधी आहेत, हे मी पाच मिनिटांत सिद्ध करेन, असा दावा करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा खुल्या चर्चेचे आव्हान पुन्हा दिले.

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की काँग्रेस देशद्रोही आहे. परंतु, पंतप्रधान स्वतःच देशद्रोही आहेत, हे मी अवघ्या पाच मिनिटांत सिद्ध करून दाखवू शकतो. कुठेही या, माझ्यासोबत बसा आणि चर्चा करा. मोदी देशविरोधी आहेत, हे मी पाच मिनिटांत सिद्ध करेन, असा दावा करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा खुल्या चर्चेचे आव्हान पुन्हा दिले.
तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे त्यांच्यावर नियंत्रण असल्याचेही त्यांनी म्हटले. पंजाबमधील संगरूर येथे कॉंग्रेसच्या इन्साफ रॅलीला राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपवरही टीका केली.
राहुल गांधी म्हणाले, सत्ताधारी म्हणतात की संसदेत चर्चा करा. पण दुसरीकडे माझा माईक बंद केला जातो; मला बोलूच दिले जात नाही. कालच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समोरासमोर चर्चेचे आव्हान दिले होते.
या चर्चेसाठी न्यायाधीश म्हणून कोणाचीही निवड करण्याचे स्वातंत्र्य मोदींना असेल. अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत किंवा उद्योगपती गौतम अदानी यांनाही न्यायाधीश म्हणून निवडू शकतात. चर्चेचे ठिकाणही त्यांनीच ठरवावे. मात्र नरेंद्र मोदी माझ्यासमोर चर्चेला बसू शकणार नाहीत, याची मला खात्री आहे. चर्चा सुरू झाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत नरेंद्र मोदी देशद्रोही असून डोनाल्ड ट्रम्प त्यांना नियंत्रित करतात, हे मी देशाला सिद्ध करून दाखवेन, असे ते (Rahul Gandhi) म्हणाले.






