RR vs LSG : राजस्थान रॉयल्सच्या कर्णधार-प्रशिक्षकात वाद? राहुल द्रविडने दिले स्पष्ट उत्तर, पाहा VIDEO

Look at Sanju Samson’s reaction — it seems like he’s not happy with Rahul Dravid, who is running the team according to his own wishes. pic.twitter.com/HdQeFl3NhM
— Registanroyals (@registanroyals) April 18, 2025
राहुल द्रविड अफवेवर काय म्हणाला?
Rahul Dravid clarified all the social media reports are wrong in the Press Conference.
– Sanju 🫂 Dravid. pic.twitter.com/WdIvWX3HgF
— Johns. (@CricCrazyJohns) April 19, 2025
राहुल द्रविडने पुढे येऊन या अफवांना पूर्णविराम दिला. तो म्हणाला की तो आणि सॅमसन एकाच विचाराने काम करत आहोत. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत द्रविड म्हणाला, “मला माहित नाही की या बातम्या कुठून येत आहेत. संजू आणि मी एकाच विचारसरणीचे आहोत. तो आमच्या संघाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. तो प्रत्येक निर्णयात आणि चर्चेत सहभागी असतो.”
हेही वाचा – RCB vs PBKS : अर्शदीप सिंगने रचला इतिहास! पीयुष चावलाला मागे टाकत केला मोठा पराक्रम
राहुल द्रविड पुढे म्हणाला, “कधीकधी, जेव्हा तुम्ही सामने हरता आणि गोष्टी व्यवस्थित होत नाहीत, तेव्हा तुम्हाला टीकेला सामोरे जावे लागते आणि आम्ही ते आमच्या कामगिरीवर घेऊ शकतो, परंतु या निराधार चर्चेबद्दल आम्ही काहीही करू शकत नाही. संघातील वातावरण खूप चांगले आहे. या लोकांनी घेतलेल्या कठोर परिश्रमाने मी खूप प्रभावित झालो आहे. एक गोष्ट लोकांना समजत नाही ती म्हणजे खेळाडू चांगली कामगिरी करत नाहीत तेव्हा किती त्रास होतो.”





