Raha Kapoor: राहाने आलिया–रणबीरसोबत २५० कोटींच्या घरात साजरा केला पहिला ख्रिसमस, नखांवर खिळल्या सगळ्यांच्या नजर

Raha Kapoor : ख्रिसमसच्या निमित्ताने अभिनेत्री आलिया भट्ट हिने इन्स्टाग्रामवर अनेक खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचे माहेरचे आणि सासरचे कुटुंबीय एकत्र दिसत असून, सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते चिमुकल्या राहाने. विशेष म्हणजे, राहाच्या नखांवरील लाल नेल पेंटवर अनेकांच्या नजरा खिळल्या.
२५ डिसेंबर रोजी संपूर्ण देशात ख्रिसमसचा आनंद साजरा होत असताना, बॉलिवूड सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर उत्सवी क्षण शेअर केले. आलियाने आपल्या नव्या घरातील काही खास आणि याआधी न पाहिलेले फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये राहासोबतच भाची समारा साहनीही आजीसोबत फोटो काढताना दिसते.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी यावर्षी नोव्हेंबर महिन्यात बांद्रा येथील पाली हिलमधील नव्या घरात प्रवेश केला. सुमारे २५० कोटी रुपये किमतीचे हे घर मुलगी राहाच्या नावावर असल्याचे सांगितले जाते. गृहप्रवेशावेळी दाखवलेल्या फोटोंमध्ये नीतू कपूरच्या नातवंडाचे छोटेसे हात सर्वांचे मन जिंकून गेले होते. आता ख्रिसमसच्या फोटोंमध्येही अनेक जण राहाला शोधताना दिसत आहेत. दोन फोटोंमध्ये ती दिसते, पण तिचा चेहरा मात्र दाखवलेला नाही.
View this post on Instagram
नव्या घरात पहिला ख्रिसमस
पहिल्या फोटोमध्ये आलिया आपली बहीण शाहीन आणि आई सोनी राजदानसोबत ख्रिसमस ट्रीसमोर पोझ देताना दिसते. दुसऱ्या फोटोमध्ये ती पती रणबीर कपूरसोबत खास क्षण शेअर करते. तिसऱ्या फोटोमध्ये आलिया, शाहीन आणि राहा एकत्र दिसतात. चौथ्या फोटोमध्ये राहा रंगभरण्याचे पुस्तक हातात घेऊन ख्रिसमस ट्री रंगवताना दिसते.
राहाच्या नखांवर सगळ्यांचे लक्ष
दरवर्षीप्रमाणे यंदाही आलियाने ख्रिसमस ट्रीवर राहाच्या नावाचा बॉल लावला असून त्याचाही फोटो शेअर केला आहे. एका फोटोमध्ये आलिया आणि रणबीरसोबत नीतू कपूर, रिद्धिमा कपूर आणि भाची समारा साहनीही दिसतात.
या सर्व फोटोंवर चाहत्यांनी “मेरी ख्रिसमस”च्या शुभेच्छा दिल्या असून, अनेकांनी खास करून राहाच्या नखांवरील लाल नेल पेंटवर कमेंट्स केल्या आहेत.





