मुंबई – अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि ‘आप’चे नेते राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्या लग्नाची मागील काही दिवसांपासून चर्चा रंगली होती.
अखेर 24 सप्टेंबर रोजी उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस’मध्ये या जोडप्याने लग्नगाठ बांधली. अनेक दिग्गज नेतेमंडळी आणि बॉलीवूड कलाकारांनी या लग्नाला हजेरी लावली होती.
नुकतेच परिणीतीने लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमधील त्यांचा रोमँटिक अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या लग्नसोहळ्याचे फोटो पाहण्यासाठी चाहते देखील आतुर झाले होते.
अखेर त्यांची ही प्रतिक्षा संपली आहे. परिणीती आणि राघव यांनी पंजाबी रितीरिवाजानुसार लग्न केलं आहे. या पोस्टनंतर राघव आणि परिणीतीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मात्र, अशातच एका बॉलिवूड अभिनेत्याने राघवचा एक व्हिडीओ ‘X’ वर (ट्विटरवर) पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्याने राघव चड्ढाच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला आहे. राघव चड्ढाच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करणारा हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून कमाल आर. खान ऊर्फ केआरके आहे.
Batao Ji, Ye Aam Aadmi Ko Bhi Aam Aadmi Se Darr Lagne Laga. These politicians are living King’s life with our Tax money because of our mistake only. pic.twitter.com/C1y6QojAWG
— KRK (@kamaalrkhan) September 24, 2023
त्याने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये राघव उदयपूर एअरपोर्टवरून बाहेर निघताना दिसत आहे. यावेळी त्याच्या आजूबाजूला मोठा बंदोबस्त दिसून येत आहे. या व्हिडीओसोबत केआरकेनं लिहिलं, “सांगा बरं, या आम आदमीलाच आम आदमीपासून भीती वाटू लागली आहे.
आपल्या चुकीमुळेच हे राजकारणी आपल्या कराच्या पैशाने राजासारखं आयुष्य जगतायत.’ असं तो म्हणाला आहे. सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटकरी देखील यावर कमेंटचा वर्षाव करत आहे.