पुणे : झील एज्युकेशन सोसायटीतर्फे आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संवाद राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी राधिका वडके यांना प्रथम पारितोषिक मिळाले आहे. अंतिम फेरीचा निकाल १.प्रथम क्रमांक – राधिका वडके ( आबासाहेब गरवारे महाविद्यालय पुणे .) २ व्दितीय पारितोषिक – श्रुती बोरस्ते ( एच .पी .टी .कॉलेज नाशिक ). ३. तृतीय पारितोषिक – प्रतिक राऊत (एलिफिन्स्टन कॉलेज मुंबई ) ४. उत्तेजनार्थ प्रथम – सूरज गायकवाड ( यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय पुणे) ५. उत्तेजनार्थ द्वितीय – व्रुषभ चौधरी (जी .एम. डी आर्ट्स कॉलेज सिन्नर ) या स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या 41 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. टीव्ही 9च्या पत्रकार अश्विनी सातव आणि काटे सरानी परीक्षक म्हणून काम पहिले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे महावक्ते प्रवीण शिंदे यांची उपस्तिथी होती. यावेळी झील ‘इंजिनिअरिंग’चे प्राचार्य काटे यांनी स्पर्धकांचे अभिनंदन केले.