Pune Gramin : माजी खासदार स्व.निवृत्तीशेठ शेरकर जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
ओझर – श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार स्व.निवृत्तीशेठ शेरकर यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा व तालुका पातळीवरील वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन मंगळवारी (ता. १२ ऑगस्ट) रोजी न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथे केले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांनी दिली.
माजी खासदार निवृत्तीशेठ नामदेव शेरकर प्रतिष्ठान, सत्यशिल शेरकर कम्युनिटी सेंटर व न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बुद्रुक यांच्या वतीने या स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येतात.
तालुकास्तरीय लहान गट (इयत्ता ५वी ते ७वी), मोठा गट (इयत्ता ८वी ते १०वी) व जिल्हास्तरीय उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन गट अशा तीन गटात ह्या स्पर्धा होणार असून स्पर्धेतील प्रथम तीन स्पर्धक व उत्तेजनार्थ रोख बक्षीसे, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
तालुकास्तरीय स्पर्धेसाठीचे विषय :
लहान गट – १. जुन्नर तालुक्यातील देवमाणूस स्व. निवृत्तीशेठ शेरकर २. वृक्षसंवर्धन काळाची गरज ३. माझी मायबोली माझी मराठी ४. हरवत चाललं गावचं गावपण ५. मला पडलेले एक रम्य स्वप्न ६. माझ्या स्वप्नातील भारत.
मोठागट – १. सहकारातील महामेरु स्व. निवृत्तीशेठ शेरकर २. स्त्री जन्मा तुझी ही कहाणी ३. आजच्या युवा पिढी पुढील आव्हाने ४. प्रसार माध्यमांची सामाजिक भूमिका ५. जगणं महाग होत आहे ६. शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावी काय.?
तालुकास्तरीय बक्षिसपात्र विद्यार्थ्यांना प्रत्येक गटासाठी देण्यात येणारे बक्षीस पुढीलप्रमाणे – १. प्रथम क्रमांकास रु. २५०१/- स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र २. व्दितीय क्रमांकास रु. २००१/- स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र ३. तृतीय क्रमांकास रु. १५०१/- स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र ४. उत्तेजनार्थ क्रमांकास रु. १००१/- स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र.
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठीचे विषय- १. सहकारमहर्षी स्व. निवृत्तीशेठ शेरकर २. राष्ट्राच्या जडणघडणीत युवकांचे स्थान ३. गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी ४. जागतिक महासत्तेच्या उंबरठ्यावरील भारत ५. जागर स्त्री मुक्तीचा सन्मान स्त्री शक्तीचा ६. माध्यमांचे राजकारण लोकशाहीपुढील आव्हान.
जिल्हास्तरीय बक्षिसपात्र विद्यार्थ्यांना देण्यात येणारे बक्षीस पुढीलप्रमाणे- १. प्रथम क्रमांक- रु. ७००१/-, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र २. व्दितीय क्रमांक रु. ५००१/-, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र ३. तृतीयक्रमांक – रु. ३००१/-, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र. ४. उत्तेजनार्थ – रु. २००१/-, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र.
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी इच्छुक स्पर्धकांनी ता.११ ऑगस्ट पर्यंत व्ही.एम.डुंबरे ९८८११९१०७९ व आर.एस.अय्यर ९३२५५७१७६१ या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





