राधिका आपटे चिमुकल्या लेकीसोबत भारतात परतली; शेअर केले खास फोटो

Radhika Apte | अभिनेत्री राधिका आपटे तिच्या चित्रपटांसह वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चांगलीच चर्चेत राहिली आहे. अलीकडेच तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सध्या ती मुलीसोबत आपला वेळ घालवताना दिसत आहे. लेकीचेसोबतचे काही फोटो ती सोशल मीडियावर देखील शेअर करताना दिसते. आता राधिका लेकीसोबत पहिल्यांदाच भारतात परतली आहे. नुकतीच तिने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केला आहे.
राधिकाने इन्स्टाग्रामवर बाळासोबतचा क्यूट फोटो शेअर केला आहे. या पोस्टला राधिकाने कॅप्शन देत लिहिले की, “मातृभूमीत पाऊल ठेवलं आहे. मुंबईशी ओळख करून देण्यासाठी आईने सर्वोत्तम महिना निवडला आहे,” तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. भारतात परतल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून दिसत आहे. Radhika Apte |
View this post on Instagram
राधिकाने 2012 मध्ये संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्नगाठ बांधली. बेनेडिक्ट टेलर हा ब्रिटीश व्हायोलिन वादक आहे. लग्नाच्या 12 वर्षांनी बेनेडिक्ट आणि राधिका आई-बाबा झाले आहेत. आई झाल्यानंतर राधिकाने दिग्दर्शन क्षेत्रात पदापर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच याबाबतची माहिती तिने सोशल मीडियाद्वारे सांगितली होती.
ती ‘कोट्या’ या ॲक्शन चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून या चित्रपटाची घोषणा सिनेव्हेश्चर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (CIFF) च्या सिने व्ही सीएचडी मार्केट लाईनअपमध्ये करण्यात आली. ‘कोट्या’ चित्रपटाची निर्मिती विक्रमादित्य मोटवानी करत आहेत. Radhika Apte |
हेही वाचा:





