Radhakrishna Vikhe Patil : मुंबईतील नियोजित आंदोलन मागे घ्या; विखे- पाटील यांचे जरांगेंना आवाहन
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतीन नियोजित आंदोलन मागे घ्यावे. संवाद आणि चर्चेद्वारे प्रश्न सोडवता येऊ शकतात, असे आवाहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी बुधवारी आंदोलक मनोज जरांगे यांना केले.

Radhakrishna Vikhe Patil : गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतीन नियोजित आंदोलन मागे घ्यावे. संवाद आणि चर्चेद्वारे प्रश्न सोडवता येऊ शकतात, असे आवाहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी बुधवारी आंदोलक मनोज जरांगे यांना केले. आंदोलन रोखण्यासाठी बळाचा वापर करण्याची कोणतीही योजना नाही. ज्यांनी आरक्षणाच्या मुद्द्याचा अभ्यास केला आहे, त्यांच्याशी चर्चा करत आहोत, असे विखे पाटील म्हणाले.
त्यांनी सांगितले की, जेव्हा गरज असेल तेव्हा समाज आणि त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यास सरकार तयार आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर समाजाकडून केल्या जाणाऱ्या टीकेचाही उल्लेख (Radhakrishna Vikhe Patil) केला. काही सदस्यांना वाटते की, शिंदे यांनी त्यांचा विश्वासघात केला. मला वाटते की त्यांनी ही भावना बाजूला ठेवली पाहिजे. शिंदे यांनी या मुद्द्यावर बराच पुढाकार घेतला होता.
न्यायालयाचा अवमान होण्याची शक्यता असूनही त्यावेळी सुमारे ५,५०० मुलांना संधी देण्यात आली होती आणि एसईबीसी प्रक्रियाही सुरू करण्यात आली होती. अनेक गोष्टी केल्या गेल्या. आपली फसवणूक झाली आहे किंवा विश्वासघात झाला आहे, असे वाटल्याने समाजाचा काही फायदा होईल असे मला वाटत नाही, असे ते (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले. सरकारने समाजाच्या भावनांचा आदर करत अनेक योजना सुरू केल्या होत्या.
आमची एवढीच अपेक्षा आहे की, गणेशोत्सवादरम्यान भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये.जरांगे पुण्याहून मुंबईला प्रवास करणार आहेत आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये अशी आमची इच्छा आहे. सुरू असलेल्या उत्सवाचा विचार करून जरांगे यांनी आंदोलन थांबवावे, असे आवाहन त्यांनी केले.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीतून निघाल्यानंतर बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास जरांगे बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे पोहोचले. त्यांच्या उपोषणाचा हा १९ वा दिवस होता. अहिल्यानगर, पुणे आणि रायगड जिल्ह्यातील खोपोली या ठिकाणांवरून प्रवास करत ते १९ सप्टेंबर रोजी मुंबईला पोहोचणार आहेत.
आरोग्याच्या समस्येमुळे दौरा रद्द होण्याची शक्यता : जरांगे
जरांगे सध्या मुंबईच्या दिशेने प्रवास करत आहेत. मात्र, दीर्घकाळ प्रवास आणि उपोषण यामुळे उद्भवलेल्या आरोग्याच्या समस्यांमुळे आपला दौरा रद्द होऊ शकतो, असे त्यांनी बुधवारी सांगितले. पाटोदा येथे पोहोचल्यानंतर त्यांनी जनसमुदायाला संबोधित केले. आपल्याला पोटात आणि पायात तीव्र जळजळ होत आहे. मी उपचार घेतले तर सरकार पूर्णपणे निर्धास्त होते.
जर मी उपचार थांबवले, तर ते तणावाखाली येतात. मुंबईचा हा दौरा माझ्या आरोग्यावर ताण आणत आहे. प्रकृती ठीक असेल तर मी पुढे जाऊ शकतो, पण उपोषण सुरू असताना इतका मोठा प्रवास करणे योग्य नाही. काहीच पर्याय उरला नाही, तर दौरा रद्दही होऊ शकतो. दौऱ्यापेक्षा आरक्षण अधिक महत्त्वाचे आहे; मात्र पोटात आणि पायात होत असलेल्या जळजळीमुळे हा दौरा करणे अशक्य वाटत आहे, असे जरांगे म्हणाले.





