Amruta Fadnavis : ‘भाऊ’ म्हणत जरांगेंना जेवणाचं निमंत्रण; आता अमृता फडणवीस म्हणाल्या ‘माझा भाऊ जे करेल ते….’
Amruta Fadnavis : आता पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांनी जरांगेंबाबत वक्तव्य केलं आहे.

Amruta Fadnavis : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या एका वक्तव्याने लक्ष वेधून घेतलं आहे. मनोज जरांगे पाटील यांना ‘माझ्या भावासारखे’ संबोधत अमृता फडणवीस यांनी यापूर्वी त्यांना थेट घरी जेवणाचं निमंत्रण दिलं होतं. त्यांच्या या निमंत्रणावर जरांगे यांनीही प्रतिक्रिया दिली होती. बहिणीने आम्हाला भाऊबीजेला बोलवावं, साडीचोळी घेऊन जाऊ, असे ते म्हणाले होते. आता पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांनी जरांगेंबाबत वक्तव्य केलं आहे. (Amruta Fadnavis)
राज्यात सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना, “सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन माझा भाऊ जे करायचं ते शांततेपूर्वकच करेल,” असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. शनिवारी अहिल्यानगर येथे समर्पण चतुर्मास कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
‘मराठा आरक्षणाचा विषय संवेदनशील’ (Amruta Fadnavis)
अमृता फडणवीस म्हणाल्या की, “मराठा आरक्षणाचा विषय हा संवेदनशील असून राज्य सरकार त्यावर मार्ग काढेल.” असंही त्या म्हणाल्या.
जरांगेंनी मुंबई आंदोलनाची तारीख केली जाहीर (Amruta Fadnavis)
दरम्यान, मनोज जरांगे यांनी आज अंतरवाली सराटी येथे मुंबईतील आंदोलनाच्या तारखेची घोषणा केली आहे. या आंदोलनातील मुक्कामची ठिकाणं त्यांनी जाहीर केली आहेत. तर २० सप्टेंबर मुंबईत मनोज जरांगे दाखल होणार आहेत.
या घोषणेनंतर गणेशोत्सवाच्या काळात जरांगे मुंबईत आल्यास कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे राज्य सरकारने सध्या मनोज जरांगे यांच्याशी कोणतीही थेट चर्चा न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाप्रकरणी मनोज जरागेंनी केलेल्या मागण्या आणखी तीव्र होणार आहेत. आता सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.






