Maratha Reservation : मराठा आंदोलक आक्रमक; राधाकृष्ण विखे पाटील यांचे बॅनर फाडले
नांदेडच्या हदगांव तालुक्यातील मराठा समाज (Maratha Reservation) आज आक्रमक झाला. सकाळी रास्ता रोको केल्यानंतर आंदोलकांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बॅनर फाडले.

Maratha Reservation : नांदेडच्या हदगांव तालुक्यातील मराठा समाज (Maratha Reservation) आज आक्रमक झाला. सकाळी रास्ता रोको केल्यानंतर आंदोलकांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बॅनर फाडले. सकल आधी मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवा त्यानंतरच बॅनर बाजी करा, अशी मागणी त्यांनी केली.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची सरकारसोबतची बोलणी फिस्कटल्याचे (Maratha Reservation) दिसून आले आहे. आपण जरांगे यांच्या 12 मागण्या मान्य केल्याचे सरकारने म्हटले. सरकारचे शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी जाणार नसल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले. त्यानंतर, मराठा समाज आक्रमक झाला आहे.
तसेच, एकही मागणी मान्य न केल्याचे सांगत जरांगे यांनी मंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्यावरुन मंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यभरात मराठा समाज आक्रमक होत असून ठिकठिकाणी आंदोलन, रास्ता रोको करण्यात येत आहेत. नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने मनमाड-गनूर चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी सरकारचा निषेध करत एक मराठा, लाख मराठाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. येत्या दोन दिवसांत संपूर्ण मागण्या मान्य न झाल्यास चांदवड तालुक्यातील मराठा बांधव मुंबईच्या दिशेने कूच करतील, असा इशाराही समाजाच्यावतीने देण्यात आला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सणामुळे आंदोलन स्थगित करावे – सामंत
संवाद गरजेचा आहे. आमच्या नेतृत्वाला (Maratha Reservation) वाईट बोलू नये. मनोज जरांगे यांना गैररसमज नाही, त्यांना कुणीतरी सांगते आणि नंतर होतो असे आम्हाला वाटते. उद्या पोळा सण आहे, मराठवाड्यात दुष्काळ आहे, राज्यात गणेशोत्सव आहे. त्यामुळे, आंदोलनाला स्थगिती द्यावी ही विनंती आहे. जरांगे आक्रमक आहेत तर, आम्ही सरकार आहोत, संयम आमच्या पाचवीला पुजला आहे. आम्हाला संयमीच बोलावे लागेल. आम्ही त्यांना अभ्यासक पाठवा असे आवाहन केले, आता ते आले नाही तर काय करावे, असा प्रश्नही सामंत यांनी केला.






