राधाकृष्ण विखे पाटील लेकासह पोहचले दिल्लीत; अमित शाहांसोबतच्या भेटीमागचं कारणही सांगितले…

Radhakrishna Vikhe Patil | राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. मात्र ही भेट अहिल्यानगरच्या लोणी बुद्रुक येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरणासाठी अमित शाह यांना निमंत्रित करण्यासाठी झाल्याचे सांगितले जात आहे.
अमित शाह यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत सहमती दर्शवली आहे. याशिवाय नवीन गाळप हंगाम सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची प्रमुख उपस्थिती लाभावी, अशी विनंतीही यावेळी विखे पाटील यांच्याकडून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याबाबतची माहिती सुजय विखे पाटील यांनी ट्वीट करत दिली आहे. Radhakrishna Vikhe Patil |
आज दिल्ली येथे मा. अमितभाई शहा (गृहमंत्री व सहकारीता मंत्री भारत सरकार) साहेबांच्या निवासस्थानी माननीय ना. राधाकृष्ण विखे पाटील (जलसंपदा मंत्री गोदावरी व कृष्णा खोरे महाराष्ट्र राज्य) यांच्या समवेत भेट घेतली. (१/३) pic.twitter.com/szYqCGM3IF
— Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe) May 3, 2025
सुजय विखे पाटलांची केंद्रात वर्णी लागणार का?
लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर वेळोवेळी सुजय विखे यांच्या पुनर्वसनाची मागणी केली आहे. नुकतेच नगर शहरात भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्ह्यातील महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं.
या सत्कार समारंभामध्ये माजी खासदार सुजय विखे यांनी पुनर्वसनाची मागणी केली होती. त्यामुळे आता सुजय विखे पाटलांची केंद्रात वर्णी लागणार का? याबाबत या भेटीत अमित शाह यांच्यासोबत काही चर्चा झाली का? असा सवाल उपस्थित होत आहेत. Radhakrishna Vikhe Patil |
हेही वाचा:





