मालवणमधील राजकोट किल्ल्यावर राडा; ठाकरे आणि राणे समर्थक एकमेकांना भिडले

Shivaji Maharaj Statue Collapse | मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मालवणमध्ये महाविकास आघाडी आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. यादरम्यान ठाकरे आणि राणे यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले. पोलिसांकडून यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आदित्य ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी
आज मालवणमध्ये महाविकास आघाडीकडून जनसंताप मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते आज मालवणमध्ये आहेत. या मोर्चात जयंत पाटील आणि आदित्य ठाकरे उपस्थित आहेत. मालवणमध्ये भाजपचे नेते नारायण राणे दाखल होताच कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती. Shivaji Maharaj Statue Collapse |
दरम्यान आदित्य ठाकरे आणि नारायण राणे एकमेकांसमोर आले होते. तेव्हा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलीस कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे सध्या कार्यकर्त्यांमध्ये मोठं संतापाचं वातावरण निर्माण झाले आहे. गडावरच दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडले आहे. तर आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांना घोषणाबाजी थांबावण्याचं आवाहन करत आहे. राणे समर्थकांनी मात्र आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, मागील दीड तासांपासून आदित्य ठाकरे येथे ठिय्या आंदोलन करत आहे. यावेळी जयंत पाटील यांनी देखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. Shivaji Maharaj Statue Collapse |
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
आदित्य ठाकरे यांनी राजकोट किल्ल्याची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, तेव्हा ते म्हणाले की, “माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत. पुतळ्यात भाजपवाले चोरी, भ्रष्टाचार करु शकतात हे आमच्या आकलनाच्या बाहेर आहे, तरी त्यांनी करुन दाखवलं आहे. पंतप्रधानांना खूश करायचं, त्यांच्याकडून कार्यक्रम करुन घ्यायचा यासाठी हे झालं आहे. काल एक निर्लज्ज मंत्री येथे आले आणि यातून चांगलं काहीतरी करु असं म्हणाले. याचा अर्थ याच्यातून अजून पैसे कमवायचे आहेत. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी यापेक्षा जास्त वारे सहन करतो. मग तुमच्या मनात महाराजांबद्दल द्वेष का?” अशी विचारणा आदित्य ठाकरेंनी केली आहे.
हेही वाचा:
मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील भयानक सत्य समोर येताच स्वरा भास्कर संतापली





