“आमच्या नेत्यांच्या केसाला धक्का बसला तर बघा…”; सुप्रिया सुळेंचा इशारा

Supriya Sule | मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज मालवणमध्ये महाविकास आघाडीकडून जनसंताप मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते आज मालवणमध्ये आहेत. यावेळी राजकोट किल्ल्यावर राणे आणि ठाकरे समर्थकांमध्ये मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यावरून सुप्रिया सुळे यांनी आमच्या नेत्याच्या केसाला जरी धक्का लागला तरी बघा असा, थेट इशाराच दिला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेविषयी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “देशाचे पंतप्रधान जेव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल जनतेला खात्री असते. परंतु किल्ल्यावर उभारलेला छत्रपतींचा पुतळा वर्षभरातच कोसळला. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे. ही पंतप्रधानांची आणि जनतेची देखील उघड फसवणूक आहे. पुतळ्याचे काम निकृष्ट का झाले यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच, पुतळा उभारण्याचे काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले होते. हि व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत टाकायला पाहिजे,” अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी केली. Supriya Sule |
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीचे नेते आणि खासदार नारायण राणे एकाच वेळी किल्ल्याची पाहणी करण्यासाठी आले असता मोठा राडा झाला. याबाबत एका वृत्त वाहिनीशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हंटले की, “कायदा आणि सुव्यवस्था, पोलिस यत्रंणा काय करत आहे. आमचे सर्व नेते जाणार हे आधीच सर्वांना माहिती होतं. जयंत पाटील यांच्यासोबत तेथील स्थानिक नेते तिथे जाणार होते ते माहिती होतं. त्यांनी काल दिवसभर माध्यमांनी सांगितलं होतं. मग सरकारचं इंटेलिजन्स काय करत आहे. गृहमंत्र्यांनी शांततेचं अपील केलं पाहिजे.” Supriya Sule |
पुढे त्या म्हणाल्या, “माझी देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी सर्वांना अपील केलं पाहिजे. शांतता राखून त्यातून मार्ग काढला पाहिजे. आमच्या सर्व नेत्यांनी सुरक्षितता आणि जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारची आहे. आमच्या कोणत्याही नेत्यांच्या केसाला धक्का बसला तर बघा काय होतं, अतिशय चुकीच आहे,” असा इशारा सुप्रिया सुळेंनी दिला आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
दरम्यान, याप्रकरणावर आमदार रोहित पवार यांनीही एक्सवर पोस्ट करत लिहिले की, राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींच्या कामात दलाली खाल्ल्याने महाराजांचा पुतळा कोसळला हि वस्तुस्थिती आहे. त्या ठिकाणी मविआ नेते पाहणी करायला गेले असता सरकारचा भ्रष्टाचार उघडा होऊ नये म्हणून भाजप नेत्यांना तसेच स्वाभिमान विकलेल्या गावगुंडांना पाठवून राडा करणे देवेंद्र फडणवीस यांना शोभत नाही. सागर बंगल्याच्या संरक्षणामुळे पत्रकारांचे माईक हिसकावण्यापासून पोलीस अधिकाऱ्यांना अरेरावी करण्यापर्यंत मजल जायला लागली आहे ,हे योग्य नाही. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची गुलामगिरी करणाऱ्या गावगुंडांचा जाहीर निषेध,” असे रोहित पवार यांनी म्हंटले आहे.
हेही वाचा:





