R Praggnanandhaan: ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदचा नवा इतिहास; नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा ठरला पहिला भारतीय
R Praggnanandhaan: 2013 मध्ये नॉर्वे चेस स्पर्धेची सुरुवात झाल्यापासून कोणत्याही भारतीय खेळाडूला हे जेतेपद मिळवता आले नव्हते

R Praggnanandhaan: भारताचा युवा बुद्धीबळपटू रमेशबाबू प्रज्ञानंद (R Praggnanandhaan) याने नवा इतिहास रचला आहे. प्रज्ञानंदने प्रतिष्ठेच्या ‘नॉर्वे चेस 2026’ या स्पर्धेचे विजेतेपद पटकावत जागतिक स्तरावर भारताचा तिरंगा फडकावला आहे. ओस्लो येथे शुक्रवारी झालेल्या अंतिम फेरीत जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमर याच्यावर प्रज्ञानानंदने विजय मिळवला आहे या स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
अंतिम फेरीपूर्वी 20 वर्षीय प्रज्ञानानंद 15 गुणांसह तिसऱ्या स्थानावर होता. मात्र निर्णायक क्षणी त्याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कीमरचा पराभव केला. प्रज्ञानंदने कमालीचा संयम आणि सर्वोत्तम बुद्धीचा वापर करत जर्मनीच्या विन्सेंट केमर (काइमर) याच्यावर शानदार विजय मिळवला. या विजयासह त्याला महत्त्वाचे 3 गुण मिळाले आणि त्याने एकूण 18 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावत विजेतेपदावर नाव कोरले. स्पर्धेतील शेवटचे सलग चार सामने जिंकण्याचा अद्भूत पराक्रमही त्याने यावेळी केला.
विजेतेपदानंतर प्रज्ञानानंदाने आपल्या यशाचे श्रेय आईला दिले आहे. तो म्हणाला, “1 जून रोजी अलिरेझाविरुद्धच्या सामन्यापूर्वी माझे आईशी बोलणे झाले होते. तिने मला सांगितले होते, ‘नवा महिना सुरू झाला आहे, तू चांगला खेळशील.’ आई नेहमीच असे म्हणते. त्यानंतर मी सलग चार सामने जिंकलो. कदाचित तिला काहीतरी जाणवत होते.” विशेष म्हणजे 2013 मध्ये नॉर्वे चेस स्पर्धेची सुरुवात झाल्यापासून आजवर कोणत्याही भारतीय खेळाडूला हे जेतेपद मिळवता आले नव्हते. (R Praggnanandhaan)
गुकेशची निराशा
स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करू न शकलेल्या कार्लसनने अखेरच्या फेरीत डी. गुकेशचा पराभव करून चौथे स्थान मिळवले. या विजयानंतरही कार्लसनला 13 गुणांसह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. (R Praggnanandhaan)
जागतिक विजेता मॅग्नस कार्लसनचा पराभव
प्रज्ञानंदच्या या संपूर्ण मोहिमेतील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याने क्लासिकल बुद्धिबळात जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू आणि पाच वेळचा वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसन याला याच स्पर्धेत दोन वेळा पराभूत केले. एकाच स्पर्धेत कार्लसनला दोनदा हरवणारा तो विश्वनाथन आनंद यांच्यानंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. आनंद यांनी 2007 मध्ये लिनारेस स्पर्धेत असा पराक्रम केला होता. R Praggnanandhaan
हेही वाचा:






