R Ashwin : आर. अश्विनच्या पोस्टमध्ये दिसली सनी लिओनी! काय आहे व्हायरल पोस्टमागची खरी ‘भानगड’? जाणून घ्या

R Ashwin Sunny Leone post viral : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून रविचंद्रन अश्विन सोशल मीडियावर खूपच ॲक्टिव्ह झाला आहे. तो आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि हटके पोस्ट्समुळे नेहमीच चर्चेत असतो. आता त्याने बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हिच्या फोटोसह शेअर केलेली एक पोस्ट चाहत्यांमध्ये कुतूहल निर्माण करत आहे. अश्विनच्या पोस्टमध्ये सनी लिओनीचा फोटो कसा आला, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. हे नक्की काय प्रकरण आहे? जाणून घेऊया.
अश्विनची ‘ती’ पोस्ट चर्चेत –
आर. अश्विनने नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये एका बाजूला सनी लिओनीचा आकर्षक फोटो आहे, तर दुसऱ्या बाजूला चेन्नईतील संधू स्ट्रीटची झलक पाहायला मिळते. अश्विनने या फोटोला कोणतीही कॅप्शन दिलेली नाही, फक्त एक इमोजी वापरली आहे. यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि यावरून सोशल मीडियावर अनेक मीम्सही व्हायरल झाले.
सनीची झलक आणि व्हायरल पोस्टमागची खास स्टोरी –
👀 👀 pic.twitter.com/BgevYfPyPJ
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) December 9, 2025
खरंतर, अश्विनच्या या पोस्टमध्ये एक खास सिनेमॅटिक हिंट दडलेली आहे. त्याची ही पोस्ट सनी लिओनी, संधू स्ट्रीट आणि आयपीएलच्या आगामी मिनी लिलावातील तमिळनाडूच्या एका अष्टपैलू खेळाडूच्या नावाशी संबंधित आहे. तो खेळाडू म्हणजे सनी संधू . हा तमिळनाडूचा अनकॅप्ड ऑलराउंडर खेळाडू आहे.
हेही वाचा – Shahid Afridi : गंभीर-आफ्रिदी वाद पुन्हा उफाळला! रोहित-विराटला सपोर्ट करत आफ्रिदीचे गंभीरवर मोठे टीकास्त्र
सनी संधूने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील टी-२० पदार्पणात सौराष्ट्रविरुद्ध खेळताना विजयी खेळी साकारली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात संधूने केवळ ९ चेंडूत ३० धावा चोपल्या होत्या. साई सुदर्शनच्या साथीने महत्त्वपूर्ण भागीदारी रचून त्याने तमिळनाडूला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. आगामी मिनी लिलावात या खेळाडूवर सर्वांच्या नजरा असतील, हे सांगण्याचा प्रयत्न अश्विनने या हटके फोटो-संयोजनातून केला आहे.
सनी संधूवर लागू शकते मोठी बोली –
View this post on Instagram
अबू धाबी येथे १६ डिसेंबर रोजी होणाऱ्या आयपीएल मिनी लिलावात सनी संधू हा अनकॅप्ड ऑलराउंडरच्या गटात आहे. ३० लाख रुपये मूळ किंमत असलेल्या सनीने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत केलेली धमाकेदार कामगिरी पाहता, मिनी लिलावात त्याच्यावर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.




