Hardik Pandya : हार्दिक पंड्या पापाराझींवर संतापला! गर्लफ्रेंडचे आक्षेपार्ह फोटो काढल्याने व्यक्त केली नाराजी, पाहा VIDEO

हार्दिक पंड्याने सोशल मीडियावर व्यक्त केला संताप
हार्दिक पंड्याने नुकतीच इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. हार्दिक आणि अभिनेत्री-मॉडेल माहिका शर्मा रिलेशनशिपमध्ये आहेत. पापाराझींनी माहिकाचे काही फोटो अशा कोनातून (Angle) क्लिक करून पोस्ट केले, जे हार्दिकला अजिबात आवडले नाहीत.
The reason why hardik pandya put insta story about her girl friend mahieka sharma…. https://t.co/QEfOjNt8eY pic.twitter.com/07ACAVLu0B
— సంచారి (@crazyy__tweets_) December 9, 2025
हार्दिकने लिहिले की, लोकप्रियता आणि कॅमेऱ्यांनी पाठलाग करणे हा त्याच्या आयुष्याचा भाग आहे, जो त्याने स्वीकारला आहे, पण यावेळी सर्व मर्यादा पार करण्यात आल्या आहेत. त्याने सांगितले की, माहिका जेव्हा वांद्रे येथील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडत होती, तेव्हा तिचे फोटो अशा कोनातून घेतले गेले, जे कोणत्याही महिलेसाठी अपमानजनक असू शकतात.
माणुसकी आणि मर्यादांचे भान ठेवावे –
Hardik Pandya’s Instagram story. pic.twitter.com/GGuLKNe4GO
— Tanuj (@ImTanujSingh) December 9, 2025
हार्दिक पंड्याने पुढे स्पष्ट केले की, कोणाचेही खाजगी क्षण सनसनाटी बनवणे चुकीचे आहे. ही केवळ हेडलाइन किंवा ‘क्लिक’ची बाब नसून, सन्मानाची बाब आहे. त्याने स्पष्ट शब्दांत सांगितले की, प्रत्येक महिला सन्मान आणि प्रतिष्ठेची हक्कदार आहे. त्याने मीडियाला आवाहन केले की, तो पापाराझींच्या मेहनतीचा आदर करतो आणि नेहमीच सहकार्य करत आला आहे, परंतु प्रत्येक गोष्ट प्रत्येक कोनातून क्लिक करणे आवश्यक नाही. “आपण माणुसकी आणि मर्यादांचे भान ठेवले पाहिजे,” असे त्याने कठोर शब्दांत सुचवले.
कधी खेळला होता टीम इंडियासाठी शेवटचा सामना?
हार्दिक पांड्याच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तो शेवटचा आशिया कप २०२५ मध्ये भारतीय संघासाठी खेळला होता. श्रीलंकेविरुद्धच्या सुपर-४ सामन्यात त्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो अंतिम सामन्यात खेळू शकला नव्हता. त्यानंतर त्याने बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये (NCA) पुनर्वसन (Rehab) केले. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेचा भाग नव्हता, परंतु आता टी-२० मालिकेच्या माध्यमातून तो दमदार पुनरागमन करणार आहे.





