नांदेडमधील १२२ जण क्वारंटाईन मुक्त
Updated On:

नांदेड : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असला तरी काही जिल्ह्यांत समाधानकारक स्थिती आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोना संसर्ग झालेला रुग्ण आढळलेला नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात आतापर्यंत ४८७ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते, त्यापैकी १२२ जणांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र अजूनही २९ जणांना रुग्णालयात निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
नांदेडमधून आतापर्यंत २१७ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, त्यापैकी १९५ नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर आज पाठवलेल्या १७ नमुन्याचा अहवाल येणे अजून बाकी आहे. जिल्यात बाहेरून आलेल्या ७२ हजार ३४० प्रवाशाना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर, या प्रवाशांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आल्याची माहिती नांदेडच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
दरम्यान,





