Putin Praise Trump । रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक केले असल्याचे समोर आले आहे. त्यांनी यावेळी ते खूप धाडसी व्यक्ती असल्याचे सांगितले. ते दोनदा हत्येच्या प्रयत्नातूनही वाचले आहेत. यासोबतच पुतिन यांनी असा विश्वासही व्यक्त केला की, “ट्रम्प खरोखरच रशिया-युक्रेन युद्ध प्रामाणिकपणे संपवू इच्छितात. अमेरिका, मध्य पूर्व आणि युक्रेनमध्ये ते जे करत आहेत त्याचा आम्ही आदर करतो.” अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भेटीच्या मुद्द्याबद्दल बोलताना पुतिन म्हणाले की, “मी आमच्या दोघांमधील भविष्यात होणाऱ्या बैठकीसाठी तयार आहे. त्यांनी अशी शक्यताही अनेक वेळा सुचवली होती.” पुतिन म्हणाले, ‘डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार, अमेरिका आणि रशियामधील संबंध पुढे जात आहेत. आमच्यातील संभाव्य बैठक दोन्ही देशांच्या भागीदारीला एका नवीन पातळीवर घेऊन जाऊ शकते.’ रशियन राष्ट्राध्यक्षांचे विधान विशेष का आहे? Putin Praise Trump । रशियन राष्ट्राध्यक्षांनी निवेदनात म्हटले आहे की, “युक्रेनमधील युद्ध सोडवणे सुरुवातीला अपेक्षेपेक्षा खूपच कठीण होते”. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबद्दल पुतिन यांचे विधान स्पष्टपणे दर्शवते की ते रशिया-युक्रेन युद्ध खरोखरच संपवण्यासाठी वचनबद्ध आहेत. मात्र, त्यांनी इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्याचाही निषेध केला आहे, कारण इराण हा रशियाचा सर्वात चांगला मित्र आहे. पुतिन ‘दिशाभूल’ झालेले व्यक्ती – ट्रम्प Putin Praise Trump । नुकतेच हेग याठिकाणी झालेल्या नाटो शिखर परिषदेत, ट्रम्प यांनी रशियन राष्ट्राध्यक्षांना दिशाभूल करणारे म्हटले. जिथे ट्रम्प यांनी कबूल केले की युक्रेन संकट सोडवणे त्यांच्या सुरुवातीच्या अंदाजापेक्षा जास्त कठीण ठरले आहे. यापूर्वी, जेव्हा व्लादिमीर पुतिन यांनी इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या संघर्षादरम्यान मध्यस्थी करण्याबद्दल बोलले होते, तेव्हा ट्रम्प म्हणाले होते की त्यांनी प्रथम त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. हेही वाचा “माझ्याजवळ येऊन बस, आपण भारताच्या प्रगतीवर चर्चा करू…”; अभिजीत बिचुकलेंच थेट एलॉन मस्कला पत्र