Putin Cardiac Arrest : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका ; घरात जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळले

Putin Cardiac Arrest : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या प्रकृतीबाबत अनेक महिन्यांपासून वावड्या उठत असताना आता त्यांच्या प्रकृतीविषयी मोठी बातमी समोर आली आहे. व्लादिमीर पुतिन याना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे. ही एसव्हीआरने या वृत्तसंस्थेने याविषयी महती दिली आहे. रशियामधील सेवानिवृत्त गुप्तचर अधिकारी आणि क्रेमलिन अधिकाऱ्यांची माहिती या संस्थेकडून देण्यात येते.
दरम्यान, या वृत्तानुसार, रविवारी रात्री ९.०५ वाजता पुतिन हे त्यांच्या बेडरूमच्या जमिनीवर पडलेले आढळले. त्यांच्या सुरक्षा कर्मचार्यांना जेव्हा आवाज आणि राष्ट्रपती जमिनीवर आदळल्याचा आवाज आला तेव्हा ते खोलीत पोहोचले. त्यावेळी ही माहिती समोर आली.
दरम्यान, मागील २ वर्षांपेक्षा जास्त काळापासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे, दोन्ही देश माघार घेण्यास तयार नाहीत.





