व्लादिमीर पुतिन यांच्या ताफ्यातील कारमध्ये स्फोट ; स्फोटानंतर राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेत वाढ

Putin Car Blast । रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या ताफ्यातील एका आलिशान कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. हा स्फोट रशियन गुप्तचर संस्था एफएसबीच्या मुख्यालयाजवळ झाला असल्याचे पोलीसाकंडून सांगण्यात येत आहे. पुतिन यांच्या ताफ्याच्या कारमध्ये झालेल्या स्फोटामुळे रशियन सुरक्षा संस्था सतर्क झाल्या आहेत. हा स्फोट अशा वेळी झाला जेव्हा अलिकडेच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पुतिन यांच्या ‘मृत्यूची भविष्यवाणी’ केली होती.
एका वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, ‘मध्य मॉस्कोमध्ये व्लादिमीर पुतिन यांच्या ताफ्यातील एका आलिशान लिमोझिनमध्ये स्फोट झाला. मात्र, हे एखाद्या कटाचा भाग आहे की गाडीतील काही बिघाडामुळे आग लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रपतींच्या गाडीत झालेल्या स्फोटानंतर, पुतिन यांच्या सुरक्षेबाबत एजन्सी सतर्क झाल्या आहेत. क्रेमलिनमध्ये त्यांच्यावर हल्ल्याचा धोका वाढला आहे. लक्झरी कार लिमोझिनला आग लावल्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये कारमध्ये ज्वाळा उठताना दिसत आहेत.
लिमोझिन पुतिन यांची आवडती कार Putin Car Blast ।
लिमोझिन कार ही रशियन राष्ट्राध्यक्षांची आवडती लक्झरी कार आहे. त्यांना अनेकदा ही गाडी वापरताना पाहिले गेले आहे. एवढेच नाही तर त्यांनी ही कार त्यांच्या मित्रांनाही भेट दिली आहे. त्यांनी ही कार उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनाही भेट दिली. युक्रेन युद्धापासून रशियन एजन्सी पुतिन यांच्या सुरक्षेबाबत सतर्क होत्या, परंतु अलीकडेच युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनीही त्यांच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती, त्यानंतर पुतिन यांना त्यांच्याच लोकांकडून धोका असल्याची भीती होती. असे सांगितले जात आहे की हे वाहन राष्ट्रपतींच्या मालमत्ता विभागाद्वारे व्यवस्थापित केले जाते, जे राष्ट्रपतींच्या वाहतुकीची काळजी घेते. घटनेच्या वेळी गाडीत कोण होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पुतिन सुरक्षेबाबत सतर्क Putin Car Blast ।
अलीकडेच, मुर्मन्स्कमध्ये फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस (FSO) च्या अधिकाऱ्यांनी सुरक्षा रक्षकांची झडती घेतली. एका वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, एका माजी अंगरक्षकाने एका रशियन वाहिनीला सांगितले की, यावरून पुतिन यांना त्यांच्या जीवाची किती भीती वाटते हे दिसून येते. त्यांनी असेही म्हटले की पुतिन यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांवर विश्वास नाही. पुतिन यांच्या सुरक्षेबाबत एजन्सी इतक्या सतर्क आहेत की, एफएसओ एजंट त्यांच्या भाषणाच्या ठिकाणांजवळील कचऱ्याचे डबे आणि गटारांचे झाकण तपासतात. राष्ट्रपती सार्वजनिक ठिकाणीही बुलेटप्रूफ जॅकेट घालतात अशा बातम्या आल्या आहेत. क्रेमलिनच्या एका सूत्राने एका वर्तमानपत्राला त्यांच्या संरक्षणासाठी संपूर्ण सैन्य तैनात आहे.
झेलेन्स्कीने पुतिनबद्दल काय दावा केला?
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी दावा केला होता की, रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची प्रकृती बिघडत आहे आणि त्यांचा लवकरच अंत होईल. गेल्या बुधवारी एका मुलाखतीदरम्यान झेलेन्स्की यांनी हे सांगितले. ते पुढे म्हणाले की, ‘पुतिन यांच्या मृत्यूनंतर लवकरच युद्ध संपेल. यादरम्यान, त्यांनी अमेरिकेला मजबूत राहण्याचे आणि मॉस्कोवर आक्रमकता थांबवण्यासाठी दबाव आणण्याचे आवाहन केले.





