पुष्कर जोगचा नवा सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Pushkar Jog New Film | अभिनेता पुष्कर जोगने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय त्याने दिग्दर्शक, निर्मात्याची जबाबदारी देखील पार पाडली आहे. यातच आता पुष्कर जोग एका नव्या प्रोजेक्टद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पुष्करने एका नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘टॅबू’ असे या चित्रपटाचे नाव असून नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला.
विशेष म्हणजे ॲमस्टरडॅम आणि पॅरिसमध्ये चित्रित होणारा हा पहिला मराठी सिनेमा असणार आहे. पुष्करने नुकतच त्याच्या या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. यादरम्यानचे काही फोटो शेअर करत “आज माझ्या ३१ व्या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करतोय. हे असेच सुरु राहु देत. या फिल्मचा विषय खूप महत्त्वाचा आहे,” असं कॅप्शन त्याने दिले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, पुष्करने ‘मुसाफिरा’सारखा भव्य चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. ‘कोक’ या आगामी बॉलिवूड चित्रपटात पुष्कर लीड रोलमध्ये झळकणार असून लवकरच त्याचा ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.
हेही वाचा:





