वॉशिंग्टन – रशियाकडून एस-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करण्यासाठी भारताला अमेरिकन निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. अमेरिकी संसदेमध्ये सीएएटीएसए कायद्यामध्ये बदल करण्यासाठीचे विधेयक आवाजी मताने मंजूर करण्यात आले. त्यानंतर रशियाकडून एस-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करण्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला आहे. चीनच्या आक्रमकतेला तोंड देण्यासाठी अमेरिका सरकारने हा निर्णय घेतला आहे.
ऑक्टोबर 2018 साली भारताने रशियासोबत 5 बिलियन अमेरिकी डॉलरचा एक खरेदी करार केला होता. यामध्ये रशियाकडून भारताला पाच एस-400 मिसाईल डिफेन्स सिस्टिम्स मिळणार होत्या. मात्र या करारानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा करार करणे म्हणजे अमेरिकी निर्बंधांना सामोरे जाणे होय, असा इशारा दिला होता.
भारतीय-अमेरिकन कॉंग्रेसचे सदस्य रो खन्ना म्हणाले, चीनच्या वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. इंडिया कॉकसचा उपाध्यक्ष या नात्याने मी आमच्या देशांमधील भागीदारी मजबूत करण्यासाठी आणि भारतीय चीनी सीमेवर भारत स्वतःचे रक्षण करू शकेल याची खात्री करण्यासाठी काम करत आहे.
करोनासोबतच आता मंकीपॉक्सचासुध्दा धोका; आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना
खन्ना म्हणाले, ही दुरुस्ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती द्विपक्षीय आधारावर सभागृहात मंजूर होताना पाहून मला अभिमान वाटतो, ते म्हणाले. एस-400 ही रशियाची सर्वात सशक्त आणि बलशाली मिसाईल डिफेन्स सिस्टिम प्रणाली असल्याचे मानले जाते. मात्र अमेरिकेच्या निर्बंधामुळे हा करार पूर्ण करण्यास अडचणी येण्याची शक्यता होती. मात्र आता अमेरिकेने हा व्यवहार करण्यासाठी भारताला निर्बंधांमधून सूट दिली आहे. त्यामुळे भारताला एस-400 एअर डिफेन्स मिसाईल सिस्टिम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिकेकडून वाघोलीतील ड्रेनेजलाईन कामांसाठी निधी