नवी दिल्ली – देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे मंकीपॉक्सचा धोकासुध्दा देशात वाढत आहे. मंकीपॉक्सचा पहिला रूग्ण केरळमध्ये आढळून आला आहे. त्यामुळे मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मंकीपॉक्सचा सामना करण्यासाठी 15 लॅबमध्ये टेस्ट केली जाणार आहे.
देशात मंकीपॉक्स संसर्गाचा पहिला रूग्ण केरळमधील कोल्लममध्ये आढळून आला आहे. हा रुग्ण संयुक्त अरब अमिरात येथून केरळला परतला आहे. तो यूएईमधील मंकीपॉक्सने बाधित रुग्णाच्या संपर्कात होता. त्याचे नमुने तपासणीसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये पाठवण्यात आले होते, तिथे त्याची पुष्टी करण्यात आली. त्यानंतर रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गावी ना लाईट, ना नेटवर्क; त्रस्त गावकरी म्हणतात…
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी सहकार्य करण्यासाठी एक उच्चस्तरीय टीम केरळला पाठवली आहे. यामध्ये राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, नवी दिल्ली येथील आरएमएल हॉस्पिटलचे डॉ. आणि आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश आहे.
आता डिजिटल मीडियासाठी नवीन कायदा; वेबसाइटची नोंदणी करावी लागणार