Punjab Election Results 2022 : ‘आप’ आता राष्ट्रीय शक्ती; अरविंद केजरीवाल पंतप्रधान होतील

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा व पंजाब पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. दरम्यान पंजाबमध्ये आपने जोरदार मुसंडी मारली आहे. कॉंग्रेस व भाजपला मोठ्या फरकाने मागे टाकत आपने बाजी मारल्याचे आतापर्यंच्या निकालावरून दिसून येत आहे. पंजाबमधील निवडणूक निकालावर आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी “आप आता राष्ट्रीय शक्ती आहे,अरविंद केजरीवाल पंतप्रधान होतील” असे ते म्हणाले आहेत.
राघव चड्ढा म्हणाले की, “आप आता राष्ट्रीय शक्ती आहे, अरविंद केजरीवाल पंतप्रधान होतील. आप आता देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची जागा घेईल” तसेच निकालाबद्दल आनंद व्यक्त करताना सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झाले आहे. अरविंद केजरीवाल यांना याचे श्रेय जाते. या निवडणुकीत पंजाबच्या जनतेने आम्हाला ही भेट दिली आहे असेही ते प्रतिक्रिया देताना म्हणाले आहेत.





