‘पारू’ मालिकेतून होणार ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट, फोटो शेअर करत लिहिले…

Paaru TV Serial | ‘पारू’ ही झी मराठीवरील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. टीआरपीच्या बाबतीतही मालिका आघाडीवर असून, जवळपास 1 वर्षापासून सुरू असलेल्या या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. मालिकेत येणाऱ्या ट्विस्टने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. मात्र, आता यातील एक पात्र प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अनुष्का हे पात्र ‘पारू’ मालिकेतून एक्झिट घेणार आहे.
या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे ही पारू आणि अभिनेता प्रसाद जवादे हा आदित्य ही भूमिका साकारत आहे. या दोघांसह मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. मात्र, आता ‘अनुष्का’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्वेता खरात मालिकेतून बाहेर पडणार आहे.
सध्या मालिकेत अनुष्का व दिशा या दोघी बहिणी मिळून आदित्य आणि किर्लोस्कर कुटुंबाला उद्धवस्थ करण्याचा प्लॅन रचत आहेत. मात्र, पारू त्यांचा प्लॅन हाणून पाडत, अनुष्काची खरी ओळख सर्वांसमोर आणणार आहे. त्यानंतर या मालिकेतून अनुष्काची एक्झिट होणार आहे.
श्वेताने इंस्टाग्रामवर मालिकेच्या स्क्रिप्टचा फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत तिने ‘One Last Time’ असे कॅप्शन लिहिले आहे. तसेच, या स्क्रिप्टवर ‘तुझा शेवटचा दिवस चांगला जावो, अनुष्का’ असेही लिहिण्यात आले आहे. आता श्वेता खरात लवकरच या मालिकेतून एक्झिट घेणार आहे.
दरम्यान, ‘पारू’ मालिका जवळपास 1 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेत शरयू सोनावणे आणि प्रसाद जवादेसह मुग्धा कर्णिक, विजय पटवर्धन, अनुज साळुंखे, संजना काळे, शंतून गंगणे या कलाकारांचीही महत्त्वाची भूमिका आहे.



