किकबॉक्सिंग स्पर्धेत पुण्याच्या कुशलला सुवर्ण
Updated On:

पुणे – भारतीय किकबॉक्सिंग संघटनेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत पुण्याच्या कुशल साळुंके याने सुवर्णपदक पटकावले.
ही स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडीत नुकतीच पार पडली. त्यात कुशलने पॉइंट फाईट या प्रकारात हे यश मिळवले. कुशल ज्युनिअर गटात सहभागी झाला होता. तो चॅम्पियन किकबॉक्सिंग अकादमीत रुपेश परदेशी व ओमकार राठोड यांच्याकडे प्रशिक्षण घेतो, अशी माहिती किशोर साळुंके यांनी दिली आहे.





