पुण्यातील मानाचा पाचवा केशरी बागवाडा गणपतीचे 5 वाजून 39 मिनिटांनी विसर्जन
Updated On:

GaneshVisarjan 2025 | पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. पुण्याचे पहिले चार मानाचे गणपती विसर्जन झाल्यानंतर आता मानाचा पाचवा केशरी बागवाडा गणपतीचे देखील विसर्जन झाले आहे. 5 वाजून 39 मिनिटांनी या गणपतीचे विसर्जन झाले आहे.
पुण्यातील मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीचच्या मिरवणुकी दरम्यान, पारंपारिक ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथकांची साथ आणि टाळ-झांजांच्या तालात भक्तगण “गणपती बाप्पा मोरया”च्या घोषणांनी दुमदुमून गेले होते.
फुलांच्या सजावटीत आणि रोषणाईच्या प्रकाशात नटलेली मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकंनी मोठी गर्दी केली होती. या वेळी भक्तांनी विघ्नहर्त्या बाप्पाला नम्रतेने निरोप दिला. विसर्जनाच्या मार्गावर भक्ती आणि उत्साहाची अद्भुत सांगड पाहायला मिळाली. GaneshVisarjan 2025 |





