Pune News : मच्छी विक्रेत्याकडून तब्बल ४८ लाखांची खंडणी उकळण्याचा प्रकार; २ जणांवर गुन्हा दाखल
Updated On:

पुणे – शहरातील एका घाऊक मच्छी विक्रेत्याकडून तब्बल ४८ लाखाची खंडणी उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात शिवम उदयकांत आंदेकर (३०, नानापेठ) आणि आकाश परदेशी (३०, रा. लोहीयानगर) यांच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील शिवम हा सराईत गुन्हेगार आहे.
याप्रकरणी एका ३८ वर्षीय व्यापाऱ्याने तक्रार दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले की, शिवम आंदेकर याने व्यापाऱ्याला दरमहा ५० हजार हप्ता जीवे मारण्याची धमकी देऊन सुरु करायला लावला.
ही रक्कम मागील आठ वर्षे आकाश परदेशी घेऊन जात होता. त्यांनी आजवर अशा प्रकारे ४८ लाखाची खंडणी उकळली आहे. दरम्यान फिर्यादीने हप्ता देण्यास नकार दिल्यावर त्याच्या दुकानातील साहित्याची तोडफोड करुन ९० हजाराचे नुकसान केले.




