Pune ZP President Election : जिल्हा परिषदेचा ‘किंग’ कोण? १७ मार्चला होणार फैसला; राष्ट्रवादीत इच्छुकांची भाऊगर्दी
Pune ZP President Election : जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक दि.17 मार्चला होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित आहे, त्यामुळे मोठी चुरस पाहायला मिळत आहे.

Pune ZP President Election – जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक दि.17 मार्चला होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित आहे, त्यामुळे मोठी चुरस पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 73 पैकी 51 गटांमध्ये विजय मिळवला आहे. मात्र, पक्षांतर्गत इच्छुकांची संख्या मोठी असल्याने जिल्हा परिषद अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील १३ तालुक्यातील पंचायत समित्यांचे सभापती आणि उपसभापती निवडीचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या निवडी दि.९ मार्चला होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
ग्रामविकास विभागाने दि. २० मार्च २०२६ पूर्वी जिल्हा परिषदेची पहिली बैठक घेऊन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि पंचायतत समितीचे सभापती, उपसभापती निवडीचे सोपस्कार पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी येत्या ९ मार्चला सभापती, उपसभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 13 पैकी 10 पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बहुमत आहे.





