Pune : परदेशी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

पुणे : परदेशी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार करणाऱ्या एकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी एका तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, शाहिद मुबारक तांबाेळी (३६, रा. मनीष पार्क, कौसरबाग, कोंढवा) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शाहिद तांबाेळी आणि पीडित तरुणीची ऑक्टोबर २०२४ मध्ये ओळख झाली होती. त्या वेळी त्याने तरुणीला परदेशी चलनात गुंतवणुकीचे (फाॅरेक्स ट्रेडिंग) आमिष दाखविले होते. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने वेगवेगळ्या आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केला.
याप्रकाराची वाच्यता केल्यास आई आणि भावाला जिवे मारण्याची धमकी दिली, तसेच समाज माध्यमात छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी दिली. तांबोळीच्या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणीने नुकतीच विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तांबाेळीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे तपास करीत आहेत.




