Pune: अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांसाठी आजपासून कार्यशाळा सुरू

पुणे– ‘द शेतकरी शिक्षण मंडळ’ संचालित पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाने सोसायटी ऑफ आॅटोमोटिव्ह इंजिनियर्स, इंडिया व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या विद्यमाने दि. २४ ते २८ डिसेंबर या कालावधीत अभियांत्रिकी विषयांच्या प्राध्यापकांसाठी राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
“राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर व नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धत आणि संशोधन’ या विषयावर नामांकित वक्ते या वेळी मार्गदर्शन करणार आहेत. जेएसपीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. बी. अहुजा, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद पाटील, एसएमई इंडियाचे सचिव केशव ताम्हणकर व जेएसपीएम चे संचालक डॉ. पी. पी. विटकर हे उपस्थित राहणार आहेत.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. तानाजीराव सावंत, संस्थेचे सचिव गिरीराज सावंत, संकुल संचालक डॉ. वसंत बुगडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा होत आहे. नवीन शैक्षणिक धोरणासोबतच नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क, एआय टूल्सचा प्रभावी वापर कसा करावा, इन्क्युबेशन इकोसिस्टिम, रिसर्च पेपर कसा लिहावा, उद्योजकतेसाठी विविध परवानगी कशा मिळवाव्यात , पेटंट फिलिंग प्रोसेस, एनआरआयएफ मानांकनासाठी तयारी, उच्च दर्जाचा संशोधन पेपर कसा लिहावा, या सर्व विषयांचा समावेश या पाच दिवसीय कार्यशाळेमध्ये केला आहे. महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांतील सुमारे १५० प्राध्यापक या कार्यशाळेसाठी येणार आहेत.



