Pune : कात्रज परिसरात उद्या पाणीपुरवठा बंद
Updated On:

पुणे – आगम मंदिर पायथा येथे जलवाहिनीची तातडीची दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने उद्या (गुरुवारी) कात्रज परिसरातील काही भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी (दि. ४ जुलै) रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा बंद असलेला भाग ः दत्तनगर, टेल्को कॉलनी, आमराई आंबेगाव बुद्रुक परिसर, दत्तनगर, वाघजाईनगर, आंबा फार्म परिसर, पंचमनगर, बडर वस्ती व परिसर, संतोषनगर, अंजलीनगर, महावीर कुंज, वंडर सिटी, सेवकान सोसायटी परिसर, गुरुवर्य परिसर, आंबेगाव खुर्द गावठाण, जांभूळवाडी आणि परिसर.





