Pune Water Cut : पुणेकरांनो पाणी भरून ठेवा! गुरुवारी ‘या’ मोठ्या भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद; पाहा यादी
Pune Water Cut : पाणीपुरवठा विभागाकडून नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे आणि काटकसरीने वापरण्याचे आवाहन.

Pune Water Cut – वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या टप्पा क्रमांक १ येथील रॉ वॉटर पाइपलाइनवर डमी प्लेट बसविणे, तसेच वडगाव जलकेंद्रात तीन नवीन किओस्क उभारण्याचे काम येत्या गुरुवारी (दि. १२ रोजी) हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे गुरुवारी सकाळी १० ते रात्री १२ वाजेपर्यंत वडगाव जलकेंद्राच्या अखत्यारीतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
काम पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा उशिरा सुरू होण्याची शक्यता असून, काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाण्याचा साठा करून काटकसरीने वापरून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
पाणीपुरवठा बंद राहणारा परिसर :
वडगाव जलकेंद्र
हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग क्रमांक २ वरील परिसर, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर.
राजीव गांधी पंपिंगअंतर्गत
सच्चाई माता टाकी परिसर, संतोषनगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, सुंदा मातानगर, वंडर सिटी, मोरेबाग, श्रीहरी टाकी परिसर, बालाजीनगर, पवार हॉस्पिटल परिसर, केदारेश्वर टाकी परिसर, सुखसागरनगर भाग १ व २, राजस सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, सुंदरबन सोसायटी, शेलार मळा, कात्रज गावठाण, भारनगर, जुना प्रभाग ३८ मधील वरखडेनगर, संपूर्ण जुना प्रभाग ४१, येवलेवाडी परिसर.





