Pune News : विसर्जन करून परतताना अपघात; ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
Pune News : गणेश विसर्जन करून परतणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर चालत्या अवस्थेत चढण्याचा प्रयत्न करत असताना खाली पडून ट्रॉलीच्या चाकाखाली आल्याने एका २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Pune News : विसर्जन करून परतणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर चालत्या अवस्थेत चढण्याचा प्रयत्न करताना खाली पडून ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २५) सायंकाळी चारच्या सुमारास काळूबाई चौकाजवळ विजय सेल्ससमोर घडली. (Pune News)
विघ्नेश संतोष पवार ( २०, रा. फ्लॅट क्रमांक २४, सातवा मजला, आदिनाथ सोसायटी, रामटेकडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश विसर्जन करून परत जाणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या मागे विघ्नेश धावत गेला. (Pune News)
त्यानंतर चालत्या ट्रॅक्टरवर चढण्याचा प्रयत्न करताना तो खाली पडला. त्याच्या डोक्यावरून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Pune News)
मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कमांड हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आला. शनिवारी (दि. २६) त्याचे शवविच्छेदन करण्यात येत असून, त्यानंतर प्राप्त अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Pune News)
प्राथमिक चौकशीत विघ्नेश हा स्वतः चालत्या ट्रॅक्टरच्या मागे धावत जाऊन त्यावर चढण्याचा प्रयत्न करताना खाली पडला आणि ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. (Pune News)





