Pune News : “स्वच्छता हीच बाप्पाची भक्ती”; दगडूशेठ हलवाई गणपती मंडप परिसरात ASR Services तर्फे मोफत स्वच्छता सेवा
Pune News : पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांच्या गणेशोत्सव कालावधीत १४ ते २४ सप्टेंबर २०२६ दरम्यान मंडप व संपूर्ण परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

Pune News : “स्वच्छता ही सेवा, सेवा हीच बाप्पाची भक्ती” या भावनेतून ASR Services तर्फे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे यांच्या गणेशोत्सव कालावधीत १४ ते २४ सप्टेंबर २०२६ दरम्यान गणपती मंडप व परिसरात स्वच्छता सेवा पार पाडण्यात आली. (Pune News)
मनुष्यबळ व सुविधा व्यवस्थापन तसेच कचरा व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असलेल्या ASR Services तर्फे या उपक्रमासाठी ७ ते १० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले. (Pune News)
दररोज सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मंडप व परिसराची स्वच्छता, कचरा संकलन, निर्माल्य संकलन आणि त्याची योग्य ठिकाणी जमा / साठवणूक करण्यात आली. (Pune News)
श्री गणपती बाप्पाप्रती कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता राबविण्यात आला. “आमच्यासाठी ही केवळ स्वच्छता सेवा नसून बाप्पाच्या चरणी अर्पण केलेली एक छोटीशी सेवा आहे. (Pune News)
स्वच्छता आणि सेवाभावाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे,” अशी भावना ASR Services तर्फे व्यक्त करण्यात आली. (Pune News)
या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे पदाधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक व सर्व संबंधितांचे ASR Services तर्फे मनःपूर्वक आभार. (Pune News)





