Pune : फर्ग्युसन महाविद्यालयात मतदार जागृती दिन
Updated On:

पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयात ‘मतदार जागृती दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी लोकशाही सुदृढ करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मतदान करण्याची शपथ घेऊन परिसरात जनजागृती करण्यासाठी प्रबोधन फेरी काढली.
प्राचार्य डॉ. विजय तडके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंधक चेतन अंकलकोटे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर कुंभार, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. सुशीलकुमार धनमने यांनी संयोजन केले.




