पुण्यातही निर्बंध शिथिल! आजपासून असतील ‘हे’ नियम

पुणे (प्रभात वृत्तसेवा) – अखेर राज्यशासनाच्या सुधारित आदेशानुसार, आज पासून पुणे शहरही रात्री 10 पर्यंत सुरू राहणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे सुधारित आदेश शनिवारी सायंकाळी काढले असून स्वातंत्र्य दिनापासून गेल्या दीड वर्षापासून कडक निर्बंधाच्या सावटाखाली असलेले पुणे शहरातील व्यापार, व्यावसाय तसेच सेवा क्षेत्र मोकळा श्वास घेणार असून ऐन सणासुदीच्या तोंडावर शहराचे अर्थचक्र पूर्वपदावर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ( pune unlock )
राज्यातील करोना रुग्णांचा आकडा लक्षणीय प्रमाणत घटल्याने शासनने संपूर्ण राज्यात स्वातंत्र्यदिनापासून करोना निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात, सिनेमागृह, शाळा तसेच धार्मिक स्थळे बंदच ठेवली जाणार असून उर्वरित सर्व क्षेत्राला चालना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
त्यानुसार, शासनाने 11 ऑगस्ट रोजी याबाबतचे आदेश काढले होते. मात्र, महापालिकेकडून अद्याप त्याबाबत कोणताही निर्णय जाहीर केलेला नव्हता, तसेच पुढे तीन दिवस शासकीय सुट्टी असल्याने आदेशाबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
अखेर शासनाच्या आदेशानुसार, आयुक्तांनीही सुधारित आदेश काढल्याने पुण्याला मोठा दिलासा मिळाला आहे. ( pune unlock )
आजपासून हे असतील नियम
सर्व प्रकारची दुकाने सर्व दिवस रात्री 10 पर्यंत सुरू
लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाला मुभा
हॉटेल, बार, रेस्टॉरंट सर्व दिवस 50 टक्के क्षमतेने रात्री 10 पर्यंत सुरू
सर्व प्रकारचे मॉल रात्री 10 पर्यंत सुरू राहणार
जीम, योगा सेंट्र, स्पा रात्री 10 पर्यंत
लसीकरणानंतर 100 टक्के क्षमतेने खासगी कार्यालय सुरू
उद्याने, मैदाने,चौपाट्या स्थानिक प्राधिकरणाच्या नियमानुसार सुरू होणार
खुल्या जागेतील विवाहासाठी 200 लोकांना मुभा ( pune unlock )





