Pune : केंद्रीय अर्थसंकल्प निराशाजनक; युवक काँग्रेसची डेक्कन येथे निदर्शने

पुणे : “केंद्रीय अर्थसंकल्यात तरुणांच्या भविष्यासाठी कोणतेही ठोस निर्णय घेतले नाहीत. रोजगार निर्मितीबाबत कोणतीही स्पष्टता नसल्यामुळे तरुणांच्या आशा सरकारने उद्ध्वस्त केल्या आहेत,’ असा आरोप करत गुडलक चौक येथे प्रदेश युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
या वेळी मीडिया विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन, पुणे शहराध्यक्ष सौरभ अमराळे, पुणे जिल्हाध्यक्ष उमेश पवार, कौस्तुभ नवले, प्रथमेश अबनावे, आनंद दुबे, भाविका राका, गणेश उबाळे, मेक्षाम धर्मावत, ऋषिकेश वीरकर, मतीन शेख, अजिनाथ केदार, विशाल कामेकर, सचिन सुडगे, सद्दाम शेख, अथर्व सोनार, हर्षद हांडे, तुषार नांदगुडे. उपस्थित होते. रोजगारासंदर्भात ठोस निर्णय घेतले नाहीत, तर राज्यभर तीव्र आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा युवक काँग्रेसने दिला आहे.
दरम्यान, अर्थसंकल्पात सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर होईल अशी कोणतीही गोष्ट नाही. बिहार व दिल्ली राज्याच्या निवडणुका समोर ठेऊन पोकळ अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे, असे युवक काॅंग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी सांगितले.





