Pune : यूजीसी नेट परीक्षा २५ ते २९ जून मध्ये
Updated On:

पुणे : सहायक प्राध्यापकासाठी अनिवार्य असलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नेट परीक्षचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले असून आता यूजीसी नेट परीक्षा २५ ते २९ जून मध्ये घेण्यात येणार आहे.
नेट परीक्षा संगणक आधारित चाचणी (सीबीटी) परीक्षा असून त्यात ८५ विषयांचा समावेश आहे. परीक्षेच्या आधी किमान १० दिवस परीक्षा केंद्राची माहिती प्रसिद्ध होईल. यापूर्वी ही परीक्षा २१ ते ३० जून मध्ये होणार असल्याचे जाहीर केले होते. सविस्तर माहिती यूजीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.





