Pune Traffic Alert : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे ग्रामीणमध्ये वाहतूक बदल
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सोहळा सन २०२६ हा १३ जुलै रोजी जेजुरी मुक्काम १४ जुलै रोजी वाल्हा मुक्काम व १५ जुलै रोजी निरा येथे विसाव्यासाठी थांवणार आहे.

Pune Traffic Alert : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सोहळा सन २०२६ हा १३ जुलै रोजी जेजुरी मुक्काम १४ जुलै रोजी वाल्हा मुक्काम व १५ जुलै रोजी निरा येथे विसाव्यासाठी थांवणार आहे. सदर पालखी पायीबारी सोहळ्यात अंदाजे ७ ते ८ लाख भाविक हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ पुणे ते पंढरपुर या मार्गाने पायी चालत असतात. तसेच सदर पालखी सोहळ्यामध्ये दिंड्याची वाहने मोठ्या प्रमाणावर असतात.
त्यामुळे पालखी सोहळा कालावधीत वाहतुक कोंडी होवू नये व पालखी सोहळ्यास अडथळा निर्माण होवु नये याकरीता जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे जितेंद्र डूडी यांनी मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ मधील तरतूदीनुसार व शासन गृह विभागाचे दि.१९/०५/१९९० चे अधिसुचनेनुसार मला प्राप्त झालेल्या अधिकाराने श्री संत ज्ञानेश्वर महाराज सोहळा सन २०२६, चे अनुषंगाने वाहतुक पर्यायी मार्गाने वळविणेबाबत खालील प्रमाणे वाहतुकीमध्ये बदल करुन पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्याचे आदेश दिले आहेत.
जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीणः बेलसर फाटा:- अ) १० जुलै रोजी रात्री २० ते १३ जुलै रोजी रात्री २० वा या वेळेत बारामती, फलटण, सातरा बाजुकडून येणारी पुणे वाजुकडे जाणारी पालखी व्यतिरिक्त सर्व वाहतुक पुर्णपणे बंद करुन बेलसर फाटा- वाघापुर चौक उरुळी कांचन मार्गे पुणे बाजुकडे वळवावी.
(ब) १३ जुलै रोजी सकाळी २० वाजता ते १४ जुलै २०२६ रात्री २० वा.पर्यंत सासवड पुणे, उरुळी मार्गे सातरा, फलटण, लोणंद, बारामती येथे जाणारी पालखी व्यतिरिक्त सर्व वाहतुक पुर्णपणे बंद करून ती बेलसर – कोथळे-नाझरे-काळा ओढा मार्गे मोरगाव कडे वळविण्यात येत आहे.
मोरगाव चौक जेजुरी: अ) ११जुलै रोजी सकाळी २० वा. ते १४ जुलै रोजीचे दुपारी १५ वा. पर्यंत वाहतुक नियमन करणे. (ब) १४ जुलै रोजी दुपारी १५ वा ते १५ जुलै रोजीचे रात्री ११ वा. सासवड, पुणे, उरुळी मार्गे सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथे जाणारी पालखी व्यतिरिक्त सर्व वाहतुक पुर्ण पुणे बंद करुन ती मोरगाव-लोणीभापकर कोऱ्हाळे मार्गे फलटणकडे वळविण्यात येत आहे.
पारगाव मेमाणे चौक पारगावः अ) दि.११जुलै रोजी सकाळी २० ते १३ जुलै रोजीचे दुपारी १७ वा. पुण्याकडे जाणारी सर्व वाहतुक हि सासवड व जेजुरी बाजुकडे जावु न देता ती उरुळी मार्गे वळविण्यात येत आहे.
(ब) १४ जुलै रोजी १५ वा. ते १५ जुलै रोजीचे रात्री ११ वा. सासवड, पुणे, उरुळी मार्ग सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथे जाणारी पालखी व्यतिरिक्त सर्व वाहतुक पुर्णपणे बंद करुन ती पिसर्वे-सुपा-लोणीभापकर कोऱ्हाळे मार्ग फलटण कडे वळविणेत येत आहे.
छत्रपती शिवाजी चौक निरा: दि.१० जुलै रोजी रात्री २० वा. १५ जुलै रोजी ११ वा. यावेळेत सातारा, फलटण, लोणंद येथुन पुणेकडे जाणेसाठी जेजुरी-सासवड वाजुकडे जाणारी सर्व वाहतुक पुर्ण पुणे बंद करणेत येत आहे व सदरची वाहतुक निरा मोरगाव-सुपा-कडेगाव चौफुला मार्गे पुणे बाजुकडे वळविणेत येत आहे
बेलसर गाव कोथळे चौक १० जुलै रोजी रात्री २० ते १४ जुलै रात्री ११ वा. या वेळेत जेजुरी मार्गे सातारा, फलटण, लोणंद बाजुकडे सर्व वाहतुक पुर्णपणे बेद करुन सदरची वाहतुक वेलसर कोथळे चौक-कोथळेगाव-नाझरे काळा ओढा गोगाय किंवा नाझरे- पांडेश्वर मार्गे सुपा मोरगाव अशी वळवावी.
जेऊर फाटा नवीन बायपास : १० जुलै रोजी रात्री ११या ते १५ जुलै रोजी रात्री ११ या वेळेत सातारा, फलटण, लोणंद येथुन पुणे बाजुकडे जाणारी पालखी व्यतिरिक्त सर्व वाहतुक पुर्णपणे बंद करुन ती वाहतुक जेऊर फाटा- मांडकी-वीर- सारोळा मार्ग सातारा हायवे पुणे अशी वळविणेत येत आहे.
भोरवाडी फाटा जेजुरीः १४ रोजी दुपारी १५ वा. ते १५ जुलै रोजीचे रात्री ११ वा. सासवड, पुणे, उरुळी मार्ग सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथे जाणारी पालखी व्यतिरिक्त सर्व वाहतुक पुर्णपणे बंद करुन ती कोळविहीरे मोरगाव रोड-मोरगाव- लोणीभापकर को-ळाळे मार्ग फलटण कडे वळविणेत येत आहे.
सुपा पोलीस स्टेशन, मोरगाव चौकः अ) १२ जुलै रोजी रात्री २० वा. ते १४ जुलै रोजीचे दुपारी १५ वा पर्यंत बारामती, निरा मार्गे पुणे कडे जाणारी वाहतुक सुपा- कडेगाव चौफुला मागे वळविण्यात येत आहे.
(ब) १४ जुलै रोजीचे रात्री २० वा. ते १५ जुलै रोजीचे रात्री ११ वा. जेजुरी, चौफुला सुपा मार्गे सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथे व्यतिरिक्त सर्व वाहतुक पुर्णपणे बंद करुन ती मोरगाव-लोणीभापकर-कोऱ्हाळे मार्गे फलटणकडे वळविणेत येत आहे.
सासवड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण: अ) १३ जुलै रोजीचे सकाळो ०५ ते १५ जुलै रात्री ११ वा.पर्यंत पुणे बाजुकडुन जेजुरी मार्गे सातारा, फलटण बाजुकडे जाणारी वाहतुक पुर्णपणे बंद करुन सासवड-नारायणपुर- कापूरहोळ मार्गे सातारा – फलटण किंवा सासवड-वरी फाटा परिंचे वीर-वाठार कॉलनी मार्गे लोणंद अशी वळविणेत येत आहे.
(ब) १३ जुलै सकाळी ०५ वा. ते १४ जुलै रोजी रात्री ११ वा. पर्यंत पुणे बाजुकडुन जेजुरी मार्गे बारामती बाजुकडे जाणारी वाहतुक पुर्णपणे बंद करुन सासवड पारगाव मेमाणे पिसर्व-सुपा मार्गे बारामती अशी वळविणेत येत आहे.
लोणंद पोलीस स्टेशन जि सातराः १४ रोजी सकाळी ५ ते १५ जुलै रात्री ११ वा.पर्यंत लोणंद बाजुकडून निरा मार्ग व नवीन बायपास मार्गे पुणे कडे येणारी वाहतुक पुर्णपणे बंद करुन लोणंद-शिरवळ-कापूरहोळ-खेड शिवापुर मागे अशी वळविणेत येत आहे.





