Pune : यंदाचे पाऊसमान १०५ टक्के

पुणे : नैऋत्य मान्सून जून ते सप्टेंबर या काळात कार्यरत असणार आहे. यंदा नेहमीच्या सरासरी पावसाच्या १०५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात विशिष्ठ कालावधीत ठराविक भागात ढगसदृस्य किंवा अतिवृष्ठी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे विभागातील आपत्ती व्यवस्थापन विभागासमोर मोठे आव्हान असणार आहे.
हवामान विभागाच्या अंदाजामुळे पुणे जिल्ह्याबरोबर विभागातील सर्वच जिल्ह्यांना विशेषत: सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. पुणे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुणे विभागातही दमदार आणि अपेक्षापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात मान्सूनपूर्व तयारी विभागस्तरीय आढावा बैठकीचे बुधवारी (दि.१४) रोजी आयोजन केले होते. या बैठकीत हवामान विभागाने जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या १०५ टक्क्यांहून अधिक पाऊस पडण्याची शक्याता व्यक्त केली. पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विभागातील पाचह जिल्ह्यांच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला आणीबाणीच्या काळात पूर्ण तयारी आत्तापासून करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
याविषयी पुणे हवामान विभागाच्या हवामानशास्त्रज्ञ सखा सानप म्हणाले की, नैऋत्य मान्सून पहिल्या टप्प्यात म्हणजे जून ते सप्टेंबर हंगामात १०५ टक्क्यांहून अधिक पडण्याची शक्यता आहे. आता फक्त पहिल्या टप्प्यातील अंदाज असून तो दरवर्षीप्रमाणेच आहे. मात्र, दुसºया टप्प्यातील अंदाज साधारणपणे मे २०२५ च्या आखेरीस जाहीर केला जाईल. तेव्हा एकूण देशात तसेच महाराष्ट्रातील पुणे, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भ विभागात पावसाचे प्रमाण आणि एकूण स्थिती कळणार आहे.





