Pune : जनसामान्यांचा विश्वास हीच माझी ताकद; हडपसर मतदारसंघात आमदार चेतन तुपे यांचा थेट संवाद

हडपसर – हडपसरच्या प्रगतीला गती देण्यासाठी जनतेच्या विश्वासाचे बळ आणि पाठबळ हेच माझे खरे सामर्थ्य आहे, असे मत महायुतीचे उमेदवार चेतन तुपे पाटील यांनी व्यक्त केले.
हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांनी हडपसरच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने मतदारसंघातील जनतेसोबत दुचाकी यात्रेच्या माध्यमातून थेट संवाद साधला. या यात्रेत नागरिकांनी चेतन तुपे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शवला. याप्रसंगी महायुतीमधील सर्व सहकारी, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध विभागांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
या दुचाकी यात्रेची सुरुवात बी.टी.कवडे रोड पासून झाली. भीमनगर, मुंढवा, केशवनगर, झेड कॉर्नर, मांजरी गाव, महादेवनगर, 15 नंबर चौक, रविदर्शन, माळवाडी, गाडीतळ, सातववाडी, गोंधळेनगर, शनि मंदिर, काळेपडळ, ससाणेनगर, हडपसर गाव, चिंतामणीनगर, श्रीराम चौक, काळेपडळ, ढेरे कॉंक्रिट, श्रीराम मंदिर, सातवनगर, श्रीराम चौक, महमंदवाडी या मार्गार नागरिकांनी ठिकठिकाणी चेतन तुपे यांचे जल्लोषात स्वागत केले, औक्षण करून, पुष्पवृष्टी करीत शुभेच्छा दिल्या.





